भारतीय क्रिकेट संघाचे ढासळते संघ व्यवस्थापन
आपल्या उभय संघातील खेळाडू त्यांच्या उणीवा व त्यावर आपल्या हातात जे आहे ते वापरून कठीण प्रसंगात जसे शांत व स्थिर विचार ठेवून आजवर धोनीने सामने विजयी केले त्याची कमी आज जाणवते.
![](https://deccanbulletin.in/wp-content/uploads/2021/06/Virat-Kohli-1-780x470.jpg)
गेल्या काही वर्षात क्रिकेटमध्ये भारतीय संघ चांगली कामगिरी करत आहे. विशेषतः विराट कोहली कर्णधार झाल्यापासून २०१६ ते २०२० पर्यंत सलग वर्षाअखेर उच्च स्थानी कायम राखण्यात यश आले आहे. विराट कोहलीने विशेषतः वेगवान गोलदाजांवर चांगले काम केले आहे.
विदेशी जमिनीवर प्रथम २०१८ च्या मालिकेमध्ये इंग्लंड विरुद्ध पराभव आला परंतु सर्व सामने जवळपास फरकाने हातातून निसटले. इंग्लंड मध्ये चुरशीची लढत देऊन २०१८ व २०२०-२१ च्या मालिकेमध्ये ऑस्ट्रेलिया मध्ये जाऊन त्यांना पराभूत केले हे सर्व एका बाजूला परंतु निर्णायक सामन्यामध्ये भारतीय टीम २०१४ पासून एकही सामन्यामध्ये विजय होऊ शकली नाही. असे असूनसुद्धा सध्याच्या क्रिकेट संघामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे अंतिम सामन्यामधील आत्मविश्वास.
आहे त्या गोष्टीचा वापर करून स्ट्रीट स्मार्ट क्रिकेट खेळून समोरच्या संघातील खेळाडूंच्या डोक्याचा विचार करून जसा सामन्यातील निकाल पलटण्याची कला एम एस धोनी मध्ये होती ती कला थोडीशी कुठेतरी कमी पडताना दिसते. आपल्या उभय संघातील खेळाडू त्यांच्या उणीवा व त्यावर आपल्या हातात जे आहे ते वापरून कठीण प्रसंगात जसे शांत व स्थिर विचार ठेवून आजवर धोनीने सामने विजयी केले त्याची कमी आज जाणवते.
याचा अर्थ असा नाही की विराट कोहली व संघ व्यवस्थापन चुकीचे आहे पण या पराभवामुळे नक्कीच पुढच्या काळात एक भक्कम संघ उभा राहील यात शंका नाही. निर्णायक सामन्यामध्ये नक्कीच मानसिक दृष्टया भक्कम खेळाडू असणे गरजेचे आहे
स्किल्स, टॅलेंट, सराव अंतिम सामन्या पर्यंत घेऊन जातील पण तो सामना जिंकण्यासाठी समोरच्या व्यक्तीच्या मानिकतेचा विचार करून आपली संसाधने वापरून तो सामना जिंकता देखील येऊ शकेल. (पृथ्वीराज गाढवे)