गृहमंत्री अमित शहांचा पुण्यातील मंडलाध्यक्षांशी मनमोकळेपणाने संवाद

पुणेभारतीय जनता पक्षाची खरी ओळख म्हणजे कार्यकर्त्यांना दिला जाणारा मान आणि संवादाची खुली दारे, हेच जिवंत उदाहरण घडले. जेव्हा केंद्रीय नागरी हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून पुण्यातील भाजप मंडलाध्यक्षांना दिल्ली दौऱ्यावर नेण्यात आले आणि त्यांना देशाचे गृहमंत्री व सहकार मंत्री  अमित शाह यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली.

संसद अधिवेशन सुरू असताना देखील अमित शाह यांनी वेळ काढत कार्यकर्त्यांशी संवाद साधला, त्यांचे प्रश्न ऐकले, आणि संघटनात्मक कार्याची सविस्तर माहिती घेतली. स्थानिक पातळीवरील समस्यांपासून ते पक्षवाढीपर्यंत विविध मुद्द्यांवर त्यांनी मंडलाध्यक्षांशी मनमोकळा संवाद केला.

या दौऱ्यात संदीप मोझे, रमेश गव्हाणे, नितीन जाधव यासह पुणे शहरातील सर्व मतदार संघातील मंडलाध्यक्षांनी संसदेच्या कामकाजाचा थेट अनुभव घेतला. हे केवळ एक औपचारिक दौरे न राहता, एक प्रेरणादायी व अनुभवसमृद्ध प्रवास ठरला. भाजप ही संघटना केवळ राजकारणापुरती मर्यादित न राहता, ती मूल्यांवर चालणारी, कार्यकर्त्यांना केंद्रस्थानी मानणारी व्यवस्था आहे, हे या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले अशी भावना यावेळी केंद्रीय नागरी हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

मंडल पातळीवरील कार्यकर्त्यांनाही पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाशी थेट संवाद साधण्याची संधी मिळते, ही भाजपच्या कार्यसंस्कृतीची मोठी जमेची बाजू आहे, आज भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असल्याचा अभिमान नक्कीच वाटत असल्याचे मत लोहगाव मंडलाध्यक्ष संदीप मोझे यांनी व्यक्त केले.

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page