वाघोलीत प्रथमच भव्य बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा
अष्टविनायक मित्र मंडळ आणि एसडी बॉक्सिंग क्लब वाघोलीच्या वतीने जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन

वाघोली : वाघोली आणि पंचक्रोशीत पहिल्यांदाच अष्टविनायक मित्र मंडळ आणि एसडी (SD) बॉक्सिंग क्लब वाघोली यांच्या वतीने दिनांक वाघोलीतील भारतीय जैन संघटना महाविद्यालयाच्या क्रीडांगणावरती भव्य अशा जिल्हास्तरीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर स्पर्धेमध्ये पुणे विभागातील जवळपास ३०० खेळाडूंचा समावेश असणार आहे. साखळी सामने २६ आणि २७ जानेवारी रोजी होतील आणि अंतिम सामन्यांचा थरार २८ जानेवारीला होणार असल्याची माहिती अष्टविनायक मित्र मंडळाचे अध्यक्ष विक्रम बापू वाघमारे यांनी दिली आहे.
वाघोली मध्ये पहिल्यांदाच होत असलेल्या अशा प्रकारच्या स्पर्धेचा आनंद आणि थरार क्रीडा प्रेमींनी अनुभवण्यासाठी तसेच भविष्यातील बॉक्सिंग स्टार खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी समस्त वाघोलीकर आणि परिसरातील गावच्या नागरिकांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक अष्टविनायक मित्र मंडळाचे अध्यक्ष विक्रम बापू वाघमारे यांनी केलेली आहे.
बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय जैन संघटना वाघोली प्रकल्पाचे मुख्य अधिकारी सुरेश साळुंखे आणि महाविद्यालयाचे क्रीडा संचालक रमेश गायकवाड यांचे सहकार्य लाभणार आहे.
बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा वाघोली येथील बीजेएस कॉलेजमध्ये दिनांक २६, २७ आणि २८ जानेवारी दरम्यान होणार असून रोज सकाळी ११ ते रात्री ८ वाजेच्या दरम्यान सामने होतील. सुर्यकांत दुधभाते (७७७४९०००४४), सागर कोळी (९७६३८४८२५९) यांचेशी संपर्क करून स्पर्धेबाबत अधिक माहिती जाणून घेता येणार आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी दोनशे रुपये प्रवेश फी भरून नोंदणी करून आपला संघ व खेळाडूसह उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
जवळपास ७०० वर्षांपासून बॉक्सिंग खेळ विकसित झाला असून ऑलिम्पिक स्पर्धेत आणि जगातील ६० देशांमध्ये खेळला जातो. बॉक्सिंग सारख्या मर्दानी खेळाचा प्रसार होण्याच्या दृष्टीने पुढील काळातही अशा प्रकारच्या राज्य आणि राष्ट्रीय स्तराच्या स्पर्धा आयोजित करण्याचा मानस आहे. बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करून स्थानिक खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा मंडळाचा प्रयत्न राहणार आहे.
– पंकज काळे (संस्थापक, अष्टविनायक मित्र मंडळ, वाघोली)