शिवसेना उपविभाग प्रमुखपदी गिरीश जैवळ

जैवळ लोहगाव-धानोरी मधून संभाव्य उमेदवार

पुणे : लोहगाव पोरवाल रोड येथील गिरीश भिमराव जैवळ यांची शिवसेना उप विभाग प्रमुखपदी निवड करण्यात आली. शिवसेना शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांच्या हस्ते जैवळ यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

धानोरी लोहगाव रेसिडेशन असोसिएशन या माध्यमातून गिरीश जवळ या भागातील समस्या महापालिकेमध्ये मांडून त्याचे निराकरण करून घेत असतात. त्याने केलेली वेगवेगळी आंदोलने चर्चेचा विषय ठरली होती. पोरवाल रस्ता भागातील प्राईड आशियाना या सर्वात मोठ्या सोसायटीचे ते चेअरमन आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्यावर आता उपविभाग प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून धानोरी-लोहगाव या प्रभागातून महापालिका निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. निवडीचे देताना जैवळ यांच्या सोबत मनोज पांडे, संतोष पाटोळे, धनराज मुंगळे, ऋषी पाटोळे यांच्यासह पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

डेक्कन मिरर प्रतिनिधीशी बोलताना जैव म्हणाले, शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांनी चांगले, सुशिक्षित लोक राजकारणात आले पाहिजेत असे आवाहन केले होते. ग्राउंड लेवल पर्यंत ते काम करत असल्याने ते करत असलेल्या कामांकडे मी आकर्षित झालो. या अगोदर देखील विश्व हिंदू परिषदेवर काम केले आहे. धानोरी लोहगाव रेसिडेंट असोसिएशनच्या माध्यमातून  सामाजिक कार्य सुरू आहे. धानोरी, लोहगाव भागात नागरी समस्या खूप आहेत. त्याची सोडवणूक करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. नवीन लोकांना संधी मिळावी यासाठी शिंदे साहेबांची इच्छा आहे. इतर इच्छुक उमेदवार अजून कोणी पक्षाचे चिन्ह लावत नाहीत, आपण मात्र शिवसेनेच्या झेंड्याखाली निवडणुक लढवणार आहोत. 

केंद्र शासन, राज्य शासन, महापालिका व इतर अशा एकूण साडे पाच हजार विविध शासकीय योजना आहेत. त्याचे आपण सॉफ्टवेअर तयार केले असून व्यक्तीचा आधार कार्ड नंबर टाकल्यास तो कोणत्या योजनेसाठी पात्र असू शकतो याची माहिती एका क्लिकवर कळणार असून ही योजना आपण घरा-घरात पोहोचवणार आहोत.

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page