वाघोलीतील श्री रामचंद्र महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा

प्रतीक कोकरे याने मिळविले गोल्ड मेडल तर शंभूराजे देशमुख व ऋषिकेश हरगुडे याने पटकावले सिल्वर मेडल

वाघोलीवाघोली येथील श्री रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य व सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे आयोजित स्पर्धेमध्ये घवघावित यश संपादन करून श्री रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

किक बॉक्सिंग, रेसलिंग व स्विमिंग या स्पर्धा नुकत्याच महाराष्ट्रा राज्य व विद्यापीठ पातळीवर संपन्न झाल्या. यामध्ये श्री रामचंद्र महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रतीक कोकरे यांनी किक बॉक्सिंग मध्ये गोल्ड मेडल तर रेसलिंग आणि स्विमिंग मध्ये शंभूराजे देशमुख व ऋषिकेश हरगुडे यांनी सिल्वर मेडल मिळवून श्री रामचंद्र अभियांत्रिक महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशामध्ये संस्थेचे संस्थापक सचिव शंकर (काका) भुमकर व मार्गदर्शक क्रीडा संचालिका डॉ. सुषमा तायडे यांचा मोलाचा वाटा आहे. विद्यार्थ्यांचा सत्कार करताना शंकर (काका) भुमकर यांनी या विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. तसेच प्रतीक कोकरे हा या विजयानंतर राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत खेळणार आहे. त्याला लागणाऱ्या सुविधा महाविद्यालयातर्फे देण्यात येणार असल्याचे क्रीडा संचालिका डॉ. सुषमा तायडे यांना सांगितले.

कार्यक्रमास संस्थेचे खजिनदार उद्धव (आप्पा) भूमकर, प्राचार्य डॉ. अविनाश देसाई, सिद्धांत शंकर भूमकर तसेच लेखापाल अनिल जमदाडे, विभाग प्रमुख प्रा. दिपाली होदाडे, डॉ. वैशाली तुराई, प्रा. विकास गायकवाड, सिराज पटेल, महादेव गोडसे आदी मान्यवर उपस्थित होते.

Download in JPEG format

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button