संत तुकाराम महाराज केसरी ठरला शिवराज राक्षे
हरियाणा केसरी अमित कुमार याला केले चीतपट

लोहगाव : येथील जगदंगुरू श्री संत तुकाराम महाराजांचा उत्सव तुकाराम बीजे पासून अखंड हरीनाम सप्ताह चालू झाला. गाथा पारायण तसेच रोज संध्याकाळी कीर्तन व रविवारी (दि. २३ मार्च) मुख्य उत्सव व त्यामध्ये ढोल लेझीम संघ व पालखी सोहळा संपन्न झाला. सोमवारी (दि. २४ मार्च) कुस्त्यांचा जंगी आखाडा संपन्न झाला. शेवटची कुस्ती डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे व हरियाणा केसरी अमित कुमार यांच्या मध्ये झाली. राक्षे याने अमित कुमार याला चितपट करत दोन लाख रुपये रोख व संत तुकाराम महाराज आजोळ ट्रस्ट, लोहगाव ही चांदीची गदा मिळवली.
यावेळी आमदार बापूसाहेब पठारे, माजी आमदार जगदीश मुळीक, आजोळ ट्रस्टचे अध्यक्ष प्रीतम खांदवे पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती संतोष लाला खांदवे पाटील, उपसरपंच दीपक मोझे, सुधीर काळभोर, प्रमोद काळे, प्रकाश खांदवे, सुनील खांदवे पाटील, हनुमंत खांदवे पाटील, सोमनाथ निंबाळकर, सोमनाथ खांदवे, दगडू खांदवे, देवीदास खांदवे, दिपक काळूराम खांदवे, दिलीप खांदवे, अविनाश मोझे, सुरज निंबाळकर, रावसाहेब राखपसरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
आखाड्याचे आयोजन संत तुकाराम महाराज आजोळ ट्रस्टच्या वतीने करण्यात आले होते. तसेच मंगळवारी सायंकाळी महाराष्ट्राची लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रम कार्यक्रम होणार असल्याचे आजोळ ट्रस्टचे अध्यक्ष प्रीतम खांदवे यांनी सांगितले. सूत्रसंचालन रामभाऊ खांदवे यांनी केले.