वाघेश्वर स्पोर्ट्स क्लब परिवाराच्या वतीने खेळाडूंचा गुणगौरव
वाघोली : वाघोली येथे वाघेश्वर स्पोर्ट्स क्लब परिवाराच्या वतीने गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये आजी, माजी गुणवंत खेळाडूंचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला.
रविवारी (दि. ११ फेब्रुवारी) वाघेश्वर स्पोर्ट्स क्लब परिवाराच्या वतीने गुणवंत आजी, माजी खेळाडूंचा गुणगौरव सोहळा, स्नेहसंमेलन व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत भरगोस यश मिळवून सहा. राज्य कर आयुक्त पदी निवड झालेली कोमल शिंदे, नुकताच महाराष्ट्र कुमारी कबड्डी संघात निवड झालेली वैभवी जाधव, एनडीए (NDA) मध्ये निवड झालेला राजवर्धन पवार, पोलीस, सैनिक अशा विविध खात्यात भरती झालेल्या क्लबच्या खेळाडूंचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. तसेच सिनेअभिनेते तथा व्याख्याते समृद्धी जाधव यांचे व्याख्यान पार पडले.
यावेळी हिंदकेसरी अभिजीत कटके, अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकर, क्रीडा संचालक टेकाळे, वासंतीताई सातव (बोरडे), वाघेश्वर स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष केतन (भैया) जाधव यांचेसह आजी, माजी खेळाडू व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना राजेंद्र पायगुडे यांनी केली.
वाघेश्वर स्पोर्ट्स क्लब परिवाराच्या वतीने आजी, माजी खेळाडूंचा गुणगौरव करण्यात आला. सन्मानामुळे खेळाडूंना उर्जा मिळते. – केतन (भैया) जाधव (अध्यक्ष, वाघेश्वर स्पोर्ट्स क्लब)