शिवसेनेच्या ढाण्या वाघाची आमदारकीकडे वाटचाल

Story Highlights
  • सलग तीन वेळा पराजय पत्करून देखील जिद्द न सोडणाऱ्या शिवसेनेच्या ढाण्या वाघाने चौथ्यांदा नगरसेवक पदाची निवडणूक लढवली आणि विजयश्री मिळवून दाखवला. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. विकास कामांच्या जोरावर नगरसेवक पदाची हॅट्रिक साधली. आता आमदार पदाकडे आगे कूच करणाऱ्या पुणे मनपा मा. गटनेते, नगरसेवक संजय (भाऊ) भोसले यांचा आज (12 डिसेंबर) वाढदिवस... त्यानिमत्ताने भाऊंच्या सामाजिक कार्याचा घेतलेला लेखाजोखा...

सैनिकी पार्श्वभूमी असलेले भोसले कुटुंब कोकणातून येरवड्यात स्थायिक झाले.  वडील सैन्य दलातून ऑनररी कॅप्टन पदावरून निवृत्त तर भाऊ माजी सैनिक असल्याने देशसेवा व समाजसेवा करण्याचे धडे लहान वयातच भाऊंना घरातून मिळाले.

मध्यमवर्गीय कुटुंबात भाऊंचा जन्म झाल्यामुळे सामान्यांचे दुःख, अडचणी जाणून घ्याव्या लागल्या नाहीत. समाजाच काही देणं लागत या भावनेने भाऊंनी समाजसेवेचा वसा घेतला. हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व उद्धव साहेब ठाकरे यांच्या कार्यावर आकर्षित होऊन कट्टर हिंदुत्ववादी विचारांशी ते प्रेरित झाले. येरवडा सारखा झोपडपट्टी भाग काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. असे असतानाही शिवसेनेचे भगवे शिवधनुष्य उचलून ते पेलण्याचे काम भोसले यांनी केले. शिवजयंती, दुर्गा माता फेस्टिवल आदी कार्यक्रम भव्यदिव्य साजरे केल्याने भाऊंची जनतेशी घट्ट नाळ जोडली गेली. कार्यकर्ते व नागरिकांच्या आग्रहास्तव १९९७ मध्ये त्यांनी पुणे महापालिकेची पहिली निवडणूक लढवली. त्यानंतर २००२ आणि २००५ साली सलग दोन वेळा निवडणुक लढवली. परंतु या तीनही निवडणुकांमध्ये त्यांना अपयश आले. अपयश पचवत भाऊंनी समाजाभिमुख कार्ये सुरूच ठेवली. जिद्द न सोडता भाऊंनी २००७ साली नगरसेवक पदाची निवडणूक लढवली. सिंगल वॉर्ड असल्याने यावेळी मात्र यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. नगरसेवक पदाची जबाबदारी मिळताच येरवडा सारखा झोपडपट्टी भागाचा नियोजनबद्ध आरखडा तयार करून कामे करण्यास सुरुवात केली. नगरसेवकाच्या पहिल्याच टर्म मध्ये भाऊंनी केलेली कामे ठळकपणे नागरिकांना वॉर्डात दिसायला लागली. विकास कामांच्या जोरावर त्यांनी सन २०१२ व २०१७ या निवडणुका पूर्ण ताकतीने लढवून मोठ्या मताधिक्यांनी जिंकल्या. २०१७ मध्ये तर त्यांनी संपूर्ण पॅनलचे नेतृत्व करत चार सदस्य स्वबळावर निवडून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. परंतु तीन जागा खेचून आणण्यात त्यांना यश आले तर एक जागा थोड्या मताने गमवावी लागली.

स्वबळावर तीन जागा निवडून आल्याने महापालिकेतील शिवसेना गटनेते पदी त्यांची वर्णी लागली. शहराच्या विकासासाठी गटनेते पदाची जबाबदारी अत्यंत चांगली पार पाडली. महापालिकेत त्यांनी केलेली अभ्यास पूर्ण भाषणे तसेच वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी पुणे शहरात त्यांचे कौतुक झाले. प्रशासनावर वचक ठेवत  रस्ते, ड्रेनेज, कचरा, लाईट, पाणी आदी विकास कामांसह विविध योजना राबवून प्रभाग हायटेक बनवला. येरवडा स्मशानभूमीचे पालटलेले रुप, सर्वात उंच तिरंगा ध्वज, पर्णकुटी चौकात शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा उभारलेला हात, इंद्रप्रस्थ उद्यानाचे चालू असलेले शिवकालीन सुशोभिकरण यामुळे येरवडाच नव्हे तर पुणे शहराच्या वैभवात भर पडली आहे.

भाऊंनी केलेल्या विविध विकास कामांमुळे नगरसेवक पदाच्या दुसऱ्या टर्ममध्ये त्यांना आमदारकी खुणावू लागली. येरवडा सारखाच विकास संपूर्ण वडगावशेरी मतदार संघात करण्याचे त्यांनी स्वप्न उराशी बाळगून दोन वेळा विधानसभेची तयारी देखील केली होती मात्र त्यांना संधी मिळाली नाही. यावेळी भाऊंना  विधानसभेची संधी मिळेल आणि आमदार पदाची माळ भाऊंच्या गळ्यात पडेल असा द्रुढ विश्वास नागरिकांमध्ये आहे. आज जनतेच्या मनातील आमदाराचा वाढदिवस.! भाऊंना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्य लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.! जय महाराष्ट्र..!!

शब्दांकन :  चंद्रकांत साठे

Download this news in JPEG

Square logo
DB Team

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button