जो जीता वही सिंकदर
खराडीच्या कुस्ती स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी सिकंदर शेखने मारली बाजी

पुणे : चंदननगर-खराडी येथील काळभैरवनाथ उत्सवा निम्मित आयोजित कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पै. सिकंदर शेख विरुद्ध हरियाणा केसरी पै. विशाल बोंदू यांच्यात झाली. यामध्ये सिंकदर शेख हा हुकमी डाव झोळीवर विजयी ठरला. त्यास ३ लाख ५१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले.
अतिशय शिसतबद्ध झालेल्या या स्पर्धेत द्वितीय क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पै. हर्षद सदगीर विरुद्ध इराणचा जागतिक विजेता पै. आदी इराणी यामध्ये झाली. आदी जखमी झाल्यामुळे हर्षदला विजयी घोषीत करण्यात आले. तृतीय क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर अशी झाली. त्यामध्ये हाताची सांड काढून घिस्सा डावावर प्रकाश बनकर विजयी झाला. चतुर्थ क्रमांकाची कुस्ती दादा शेळके विरुद्ध निशांत कुमार (हरियाणा) यांच्यात बरोबरीत सुटली. पाचव्या क्रमांकासाठी ग्रीकोमहाराष्ट्र केसरी पै. शिवम सिदनाळे विरुद्ध मध्यप्रदेश केसरी पै. गौरव यांच्यात झालेल्या कुस्ती मध्ये शुभम सिदनाळे घुटना डावावर विजयी. तर सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये नाशिकचा पै. बाळू बोडके याने सेना दलाचा पै. विनोद कुमार यास एक चाक डावावर चितपट केले. सातव्या क्रमांकासाठी महाराष्ट्र चॅम्पियन रविराज चव्हाण याने सेना दलाचा आंतरराष्ट्रीय पै. अमित कुमार याच्यावर चितपटीने विजय मिळवला. अशा एकूण ४० लाख रुपयांच्या ७५ इनामी कुस्त्या झाल्या.
जुने महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, उप महाराष्ट्र केसरी आदी मल्लांचा ५ लाख ५१ हजार रोख रक्कम देऊन युवा नेते सुरेंद्र पठारे यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
सर्व मल्ल कुस्ती संघटक कोच यांची भोजन व्यवस्था आमदार बापुसाहेब पठारे व माजी नगरसेवक महेंद्र पठारे यांच्या वतीने करण्यात आली होती. महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळ यांचा रोख १ लाख रुपये देऊन आमदार पठारे यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
सदर आखाड्यामध्ये हिंदकेसरी दिनानाथसिंह, महाराष्ट्र केसरी शिवाजी पाचपुते, महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड, रघुनाथ पवार, राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेता राम सारंग, आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर शंकर कंधारे, गोविंद पवार अशा १८ महाराष्ट्र केसरी व ६ उप महाराष्ट्र केसरी यांसह अॅड. राजेंद्र उमाप, अॅड. वसंतराव मानकर उपस्थित असल्याची माहिती आखाडा प्रमुख माजी नगरसेवक महादेव पठारे
आखाडा यशस्वी होण्यासाठी ट्रस्टचे नवनिर्वाचित अध्यक्ष बबन पठारे पाटील, गुलाब पठारे, विलास कंडरे, ट्रस्टचे माजी अध्यक्ष राहुल पठारे, नवनाथ पठारे, पंढरीनाथ गरुड, प्रसाद पठारे, कैलास पठारे, महेंद्र पठारे, बाळासाहेब राजगुरू, दिलीप पठारे पा. आदींचे सहकार्य लाभले.