कुस्तीगीर संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी पै. मेघराज कटके
पै. संदिप भोंडवे यांची माहिती
वाघोली : कुस्तीगीर संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी पै. मेघराज कटके यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आल्याची माहिती कुस्तीगीर संघाचे मावळते जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संदीप भोंडवे यांनी दिली.
पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली असून या सभेत सर्वानुमते पै. मेघराज कटके यांची पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर कटके यांचा सत्कार पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे मावळते अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संदीप भोंडवे यांच्या हस्ते पार पडला.
याप्रसंगी कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. विलास कथुरे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे तांत्रिक प्रमुख दीनेश गुंड, जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष माऊली ताकवणे, पै. नवनाथ घुले, खजिनदार पै. पांडुरंग खानेकर, सरचिटणीस मारुती मारकड, सभासद पै. खंडु वाळुंज, राजेंद्र जगताप, झेंडु पवार, आप्पा धुमाळ, विलास कदम, राजेंद्र पाबळे, पै. बाळासाहेब कोलते, पै. सचिन पलांडे, पै. गोविंद आंग्रे, पै. श्रीकांत जांभुळकर, सागर भोंडवे आदी कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी, सदस्य, पैलवान उपस्थित होते.
यापुढे कुस्तीगीर संघाच्या पुणे जिल्ह्यात कुस्ती क्षेत्राचे नाव उच्च स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कटके यांनी सांगीतले. जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यासाठी कुस्तीगीर संघाच्या सर्वांनीच माझ्यावर जो विश्वास दाखविला तो पुढे सार्थ करून संघटनेत आदर्शवत काम करणार असल्याचे कुस्तीगीर संघाचे नवनिर्वाचित पुणे जिल्हाध्यक्ष पै. मेघराज कटके यांनी सांगितले.
२०१४ साली पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचा अध्यक्ष झालो. त्याचवेळी मी सर्वांना सांगितले होते की, जिल्हाध्यक्ष म्हणून मी फक्त १० वर्ष काम करणार आहे. १० वर्षापुर्वी जो शब्द दिला तो पाळला आहे. कुस्ती क्षेत्रात व कुस्तीगीर संघात पै. मेघराज कटके यांनी उत्तम कामगिरी केल्याने सर्वांनीच त्यांच्या कामाची दखल घेऊन जिल्हाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली आहे.
–पै. संदिप भोंडवे (कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ)