युवराज कटके सोशल फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद – प्रदीप कंद
सीझन बैंक्वेट हॉल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत खेळाडूंची निवड प्रक्रिया संपन्न

पुणे : क्रिकेट स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड प्रक्रिया (ऑक्शन) आयपीएल सारखीच असल्याचे मत पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा पिडीसीसी बँकेचे संचालक प्रदिप (दादा) कंद यांनी व्यक्त केले. ते युवराज कटके सोशल फाउंडेशनच्या वतीने वाघोली सोसायटी प्रिमियर लीग (WSPL) क्रिकेट स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड प्रक्रिया सोहळा कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.
पुढे ते म्हणाले की युवराज कटके सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून वाघोलीतील सोसायटी मधील खेळाडूंसाठी स्पर्धेचे आयोजन उत्कृष्ट खेळाडू घडवण्याचे काम मुख्य आयोजक सोमनाथ (बापू) कटके व युवराज (भैया) कटके यांच्या पुढाकारातून केले जात आहे, हे खरोखरचं कार्य कौतुकास्पद आहे.
युवराज कटके सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित मुख्य आयोजक सोमनाथ (बापू) कटके व युवराज (भैया) कटके यांच्या मार्गदर्शनाखाली (WSPL) वाघोली सोसायटी प्रिमियर लीग भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा (पर्व-३) महासंग्रामचा थरार आव्हाळवाडी येथील राजगड स्पोर्ट अॅकडमी ग्रीन ग्रास क्रिकेट ग्राऊंडवर रंगणार आहे. भव्य स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड प्रक्रिया वाघोली येथे सीझन बैंक्वेट हॉल येथे १९ व २० जानेवारी रोजी आयोजक, संघमालक, मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीतीत संपन्न झाला.
वाघोली सोसायटी प्रिमियर लीग (WSPL) क्रिकेट स्पर्धेतील लिलाव प्रक्रियेत वाघोलीतील एकूण ९२ सोसायट्यांमधील ३२ संघातून तब्बल १५०० खेळाडूंमधून १४ संघमालक यांनी खेळाडूंवर बोली लावत प्रत्येकी संघात खेळाडू घेतले असल्याची माहिती इव्हेंट (AK47) मॅनेजमेंटचे ओनर अशोक खांडेकर यांनी दिली.
खेळाडू निवड प्रकिया सोहळ्याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप (दादा) कंद, वाघेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तथा वाघोलीचे माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील, वाघोलीचे माजी उपसरपंच शांताराम कटके, माजी उपसरपंच समीर भाडळे, माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे, माजी पंचायत समिती सदस्य सुरेश सातव, दत्तात्रय कटके, संदेश आव्हाळे, भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्ष संदिप सातव, भाजप युवा मोर्चाचे मा. अध्यक्ष अनिल सातव पाटील, संपत गाडे, प्रकाश जगधने, रविंद्र कुटे, सुधीर भाडळे, अमोल शिवले, पिंटू कटके, सुनील (चाचा) जाधवराव, प्रकाश जमधडे, सामाजिक कार्यकर्ते पंडित डोंगरे, निवेदक अतुल बनकर, पुणे पोलिस तथा समालोचक प्रवीण कामटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सातत्याने मागील तीन वर्षांपासून स्पर्धेचे मुख्य आयोजक सोमनाथ (बापू) कटके व युवराज (भैया) कटके स्पर्धेच्या माध्यमातून दर्जेदार खेळाडू घडवण्याचे काम करत आहेत. अतिशय नियोजन पद्धतीने खेळाडूंची निवड प्रक्रिया राबवून वाघोली सोसायटी प्रिमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या स्पर्धेतून उत्कृष्ट खेळाडू घडणार आहेत.
– राजेंद्र (अण्णा) सातव पाटील (माजी उपसरपंच, वाघोली)