जुन्नर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी पाच कोटी

Story Highlights
  • पालकमंत्री व ग्रामविकासमंत्री यांच्या माध्यमातून निधी मंजूर
  • पावसाळ्यानंतर होणार कामे सुरु
  • आमदार अतुल बेनके यांची माहिती

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यासाठी ग्रामीण विकास निधी (२५-१५) मधून ३० कामांना ५ कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी दिली.

अधिक माहिती देताना आमदार अतुल बेनके यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील गावांर्गत मुलभूत सुविधांच्या कामासाठी लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांना ग्रामविकास विभागाकडून निधी मंजूर केला जातो. या कामांमध्ये उच्छिल अंतर्गत केदारेश्वर मंदिर ते आनंदवाडी रस्ता डांबरीकरण करणे २० लक्ष, आंबोली अंतर्गत मिनेश्वर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १५ लक्ष, निरगुडे अंतर्गत रामवाडी रस्ता डांबरीकरण करणे २० लक्ष, हडसर अंतर्गत पेठेची वाडी ते मुंढे गवारी वस्ती रस्ता करणे १० लक्ष , नेतवड येथे ग्रामसचिवालय बांधणे २० लक्ष, डिंगोरे रा.मा. २२२ ते गोटुंबी कालवा रस्ता करणे २० लक्ष, पांगरी माथा माळवाडी रस्ता ते ताम्हाणेमळा रस्ता करणे २० लक्ष, उदापूर भैरवनाथ मंदिर ते नेतवड माळवाडी जोड रस्ता करणे ३० लक्ष, कुमशेत येथील इनाम वस्ती रस्ता डांबरीकरण करणे १० लक्ष, पिंपळगाव सिद्धनाथ गणेशखिंड ते पानसरेवाडी रस्ता करणे २० लक्ष, डिंगोरे पाणेश्वर मंदिर येथे सभा मंडप बांधणे १० लक्ष, मांडवे वरडीनाथ मंदिर येथे सभामंडप बांधणे ५ लक्ष, हिवरे बु. भोरवाडी येथे सभागृह मुख्य चौक करणे २० लक्ष, कोल्हेवाडी भैरवनाथ मंदिर येथे सभा मंडप बांधणे ५ लक्ष, बेलसर येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणे २० लक्ष, आपटाळे येथे बहुउद्देशीय सामाजिक सभागृह बांधणे १० लक्ष, सुराळे येथे सामाजिक सभागृहास संरक्षक भिंत बांधणे १० लक्ष, कोपरे हागवणेवाडी काळुबा वस्ती रस्ता करणे ५ लक्ष, घंगाळदरे येथील वरसुबाई मंदिराजवळ जागेस संरक्षक भिंत बांधणे १५ लक्ष, गुंजाळवाडी आर्वी येथील स्मशानभूमी रस्ता कॉंक्रिटीकरण करणे २० लक्ष, गुंजाळवाडी आर्वी येथे बहुउद्देशीय सभागृह बांधणे २० लक्ष, गुंजाळवाडी आर्वी येथील गगनगिरी रोड म्हाळुंगे रस्ता डांबरीकरण करणे २० लक्ष, राजुरी एन एच ६६ ते उपळीमळा रस्ता मजबुतीकरण करणे ३० लक्ष, काटेडे येथील अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे २० लक्ष, निमगाव तर्फे म्हाळुंगे येथील कुलस्वामिनीनगर ते निमगिरी रस्ता व धडगे ते समर्थ नगर रस्ता करणे २० लक्ष, येणेरे येथे ताजणे वस्ती कुसुर जोड रस्ता करणे १५ लक्ष, येणारे येथील काटेडे शिव ते दत्त कॉलनी मार्ग वडज धरण रस्ता करणे २० लक्ष, येणेरे येथे मांजरवाडी गोल्याडोंगर मार्ग शेडपिंपळ रस्ता करणे २० लक्ष, ओतूर कपर्दिकेश्वर मंदिर स्टेडियम सुशोभिकरण करणे २० लक्ष, हिवरे खुर्द लोकेश्वर मळा रस्ता करणे १० लक्ष या ३० कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच निविदा प्रक्रिया होऊन पावसाळा संपल्यानंतर ही कामे सुरू होणार असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.

 

 

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button