Video: लोहगाव-धानोरी रस्त्यावर धोकादायक चेंबर
अपघात टाळण्यासाठी नागरिकांचा ‘देशी जुगाड’

पुणे : लोहगाव-धानोरी रस्त्यावरील साठेवस्ती येथील फुलवाल्या समोर असलेल्या चेंबरचे झाकण तुटल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांनी अपघात होऊ नये म्हणून तात्पुरता ‘देशी जुगाड’ करून तो भाग झाकला असला तरी कायमस्वरूपी दुरुस्तीची गरज आहे.
या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची व पादचारींची वर्दळ असते. त्यामुळे अपघाताची शक्यता टाळण्यासाठी पुणे महानगरपालिका पथ विभागाने तातडीने चेंबरचे झाकण बसवावे, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, कळस–धानोरी–लोहगाव भागातील नागरिकांनीही आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी अशा स्थानिक समस्यांवर तत्काळ लक्ष देऊन तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.