आगामी निवडणुका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने लढवल्या जातील – माजी खासदार आढळराव पाटील 

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिरूर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे. याच अनुषंगाने शिरूर, अण्णापूर ,रामलिंग या भागाचा दौरा करून तेथील ग्रामपंचायतीचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे माजी खासदार आढळराव पाटील यांनी सांगितले.

शिरूर : शिरूर तालुक्यातील आगामी घोडगंगा सहकारी साखर कारखाना, जिल्हा परिषद, बाजार समिती, शिरुर नगरपरिषद निवडणूका राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार लढवल्या जातील. परंतु वेळ पडली तर स्वबळावर शिवसेना पक्ष तालुक्यातील आगामी निवडणुका लढवण्याची तयारी ठेवणार असल्याचे प्रतिपादन शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले आहे.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गावभेट दौऱ्याचे शुक्रवार (दि.१८ जून) रोजी आयोजन केले होते. त्यानंतर येथील विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिरूर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे. याच अनुषंगाने शिरूर, अण्णापूर ,रामलिंग या भागाचा दौरा करून तेथील ग्रामपंचायतीचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे माजी खासदार आढळराव पाटील यांनी सांगितले.

पुणे-नगर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी नविन एजन्सीच्या माध्यमातून डिपीआर काढण्याचे काम सुरू असुन काही कालावधी लागणार आहे. पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी अधिकाऱ्यांशी बैठका सुरू आहेत. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड पहिला उपक्रम असणार असल्याचेही सांगुन भुसंपादनाचे काम सुरू असल्याचे सांगितले. लवकरच हा प्रकल्प पुर्णत्वास येणार आहे अशी माहिती माजी खासदार आढळराव पाटील यांनी दिली.

शिवसेना पक्षातून मी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आता भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे. परंतु शिवसेना पक्षाने सर्व काही दिले असताना मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. विरोधक मात्र मी अन्य पक्षात जात असल्याची चर्चा करत आहेत.

शिरूर लोकसभा शिरूर तालुका प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पक्षाची बांधणी सुरू आहे. पक्षातील किरकोळ वाद मिटवून सर्व शिवसैनिकांना एकजूट करणात आहे. शिरूर तालुक्यात असणारी गटबाजी काही दिवसात संपलेली दिसणार असून आज सर्वजण माझ्याबरोबर दौऱ्यामध्ये आहेत. लवकरच शिरूर तालुक्यात रांजणगाव गणपती या भागात व्हेंटिलेटर ऑक्सिजन असणारे कॉविड सेंटर सुरू करणार आहे. हे कोविड सेंटर सर्वांना मोफत असणार असल्याचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button