गळ्याला धारधार शस्त्र लावून पळवली बिअर
सराईत गुन्हेगारांचे कृत्य

विश्रांतवाडी : बिअर उधार न दिल्याने तिघा तरुणांनी बिअर शॉप मधील कामगारास धारधार शस्त्राचा धाक दाखवत बिअर चोरून नेली. हा प्रकार विश्रांतवाडीतील टिंगरे नगर रस्त्यांवर घडला. या प्रकरणी अज्ञात तिघा विरुद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी आठच्या सुमारास टिंगरे नगर, लेन नंबर ६ येथील निदमय बिअर शॉपी येथे फिर्यादी काम करत होते. बिअर शॉपीचे मालक दुकानात नसताना मालकाच्या ओळखीचे असलेले तिघेजण मोटर सायकल वरून आले. फिर्यादी यांना उधारीवर बिअरची मागणी करु लागले. फिर्यादी यांनी शॉपमध्ये मालक नसल्याने उधार बिअर देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने तिघांनी त्यांचे हातातील धारधार हत्यार फिर्यादीच्या गळ्यावर लावुन त्यांना जीवे मारण्याची धमकी देवुन हाताने मारहाण केली. तसेच बिअर शॉपमधील बीअरच्या कॅण्ड व बॉटल जबरदस्तीने घेवुन गेले आहेत. सराईत रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून या प्रकरणी अधिक तपास विश्रांतवाडी पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक माळी करत आहेत.