बोलेरो पिकअपची चोरी करणारा अटकेत  

वाघोली पोलीस तपास पथकाची कामगिरी; एक वर्षापूर्वी चोरी गेली होती बोलेरो गाडी  

वाघोलीलोणावळा परिसरातून एक वर्षापूर्वी बोलेरो पिकअपची चोरी करणाऱ्या सराईताला वाघोली पोलीस तपास पथकाने सापळा रचून वाघोलीतील बाजारतळ परिसरातून ताब्यात घेवून जेरबंद केले आहे.

सुनिल आण्णा कांबळे (वय ४०, रा. रामनगर, वारजे माळवाडी) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाघोली पोलीस तपास पथक गुरुवारी (दि. १९ जून) हद्दीत गस्तीवर असताना पथकातील पोह प्रदीप मोटे यांना गुप्त बातमीदारामार्फत एक वर्षापूर्वी लोणावळा भागातीतू चोरी गेलेली पिकअप गाडीसह एक संशयित वाघोली येथील बाजारतळ परिसरात थांबला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. तपास पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने मावळ तालुक्यातील औंढोली येथून गाडी चोरल्याची कबुली दिली. वाघोली पोलिसांनी आरोपीसह गाडी लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिली.

सदरची कामगीरी पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त हिम्मत जाधव, सहा. पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली वाघोली पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे, तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल, सहा. पोलीस उपनिरीक्षक रमेश साबळे, पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे, प्रदीप मोटे, शिवाजी चव्हाण, समीर भोरडे, दीपक कोकरे, साईनाथ रोकडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, मंगेश जाधव, राजाराम अस्वले, शिवाजी सालके, प्रितम वाघ यांनी केली.

Download in JPEG format

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page