बंद घराचे कुलूप तोडून दागिने, टीव्ही, दुचाकी चोरट्यांनी केले लंपास

वाघोली : मुलीला भेटण्यासाठी गावी गेले असताना बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले जवळपास १.४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, टीव्ही, व घरात लावलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना डोंगरगाव येथील बकोरी रोड येथे घडली. या प्रकरणी अनिल गायकवाड यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.