महिलेचे अश्लील फोटो केले व्हायरल
३३ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल

वाघोली : बोलत नसल्याचा राग मनात धरून एका तरुणाने महिलेसोबत काढलेले दोघांचे अश्लील फोटो व्हायरल करुन विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी ३३ वर्षीय तरुणावर आयटी ॲक्ट व विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. यावरुन सागर काळे (वय ३३, रा. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी आणि फिर्यादी पूर्वी हडपसर परिसरात एकाच परिसरात राहत होते. त्यामुळे ते एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यानंतर महिलेने घर बदलून दुसरीकडे राहायला गेली. त्यामुळे त्यांच्यात बोलणे होत नव्हते. महिला बोलत नसल्याचा राग आरोपीताच्या मनात होता. त्याने हडपसर परिसरात राहत असताना दोघांचे एकत्रित काढलेले अश्लील फोटो महिलेला व तिच्या पतीच्या व्हॉट्स ॲपवर पाठवून व्हायरल करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याबाबत महिलेने जाब विचारला असता त्याने अजून अश्लील फोटो सर्वांना पाठवून बदनामी करणार असल्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.