मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय

वाघोली पोलिसांचा बाईफ रोडवरील स्पा सेंटरवर छापा;  दोघांवर गुन्हा दाखल

वाघोली वाघोली येथील बाईफ रोडवरील ब्लू शार्क स्पा अँड वेलनेस सेंटर येथे मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्याव्यवसायावर वाघोली पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी स्पा चालक साहिल हुसेन (रा. विमाननगर) व स्पा मालक साक्षी कावळे (रा. वाघोली) यांच्यावर वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिला पोलीस हवालदार वर्षा बांगर यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत मिळालेल्या माहिती नुसार, ब्लू शार्क स्पा अँड वेलनेस सेंटरमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती वाघोली पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक संबंधित ठिकाणी पाठवून खातरजमा केली. सेंटरमध्ये तीन महिलांकडून स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी मोबाईल, डिव्हीआर, रजिस्टर व इतर साहित्य जप्त केले आहे.

Download in JPEG format

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page