मांजरी खु. येथे जुगार अड्ड्यावर छापा

गुन्हे शाखा युनिट-६ ची कामगिरी; २६ हजारांचा मुद्देमाल जप्त

वाघोली मांजरी खुर्द येथील सिल्व्हर ड्रीम सोसायटी पाठीमागे, पवार वस्ती परिसरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने छापा टाकून दहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्यान्वये वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महादेव उत्तरेश्वर क्षिरसागर (वय ४५ रा. मांजरी बु. पुणे), सखाराम माधव कांबळे वय ३३ रा. घोरपडे वस्ती, लोणीकाळभोर, पुणे), अतुल सुभाष घाडगे (वय ४० रा. गवळी वस्ती, मांजरी बु. पुणे), माऊली विश्वास सुरवसे (वय ३२ रा. झेड कॉर्नर, मांजरी बु. पुणे), अमोल शिवाजी गायकवाड (वय ३२ रा. मांजरी खु. पुणे), भैरवनाथ माणिक धोंडे (वय ४० रा. मांजरी बु. पुणे), अजय उकाराम घुले (वय ४२ रा. मांजरी बु. पुणे), अशोक बलराज कुमार (वय ३० रा. मांजरी बु. पुणे), आकाश मनोहर दिवटे (वय २६ रा. झेड कॉर्नर, मांजरी बु. पुणे), अमोल सुधाकर क्षिरसागर (वय ३० रा. मांजरी बु. पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट-६ चे पथक गस्तीवर असताना गुप्त बातमीदारमार्फत मांजरी खुर्द येथील सिल्व्हर ड्रीम सोसायटी पाठीमागे, पवार वस्ती परिसरात एक इसम पत्याचा क्लब चालवत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. सदर ठिकाणी पथकाने जावून अचानकपणे छापा घालून दहा जणांना ताब्यात घेतले. त्यांचेकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य व एक मोटार सायकल असा एकूण २६ हजार ३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी वाघोली पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहा.पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण व त्यांचे पथकाने केली आहे.

Download in JPEG format

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page