भावडी, तुळापुर येथे वीज चोरी
लोणीकंद पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल

वाघोली : भावडी येथे अनधिकृतपणे वीज चोरी करून ५००५ युनिटची चोरी, तर तुळापुर येथे अनधिकृतपणे वीज चोरी करून २३८८ युनिटची चोरी केल्याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणच्या पेरणे शाखेने सदरची कारवाई केली आहे.
याप्रकरणी सहाय्यक अभियंता अंकुश मोरे (रा. वाघोली) यांनी फिर्याद दिली आहे. वीज चोरी व महावितरणचे ७३ हजार ६३० रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी भावडी येथील अनिता कदम, दीपक कदम यांच्यावर भारतीय विद्युत अधिनियम कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीज चोरी व महावितरणचे ३३ हजार २१० रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी तुळापुर येथील भगवंत शिवले यांच्यावर भारतीय विद्युत अधिनियम कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.