लोहगावात तब्बल सात तास विद्युत पुरवठा खंडीत

महावितरणच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी केला संताप व्यक्त

लोहगावअंतर्गत केबल मध्ये तांत्रिक बिघाड होऊन त्याचा दोन ठिकाणी परिणाम झाल्याने लोहगाव मधील संत नगर पासुन ते वाघोली रोड परिसरातील तब्बल सात तास विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. बुधवारी सकाळी चार वाजता गेलेली वीज ११ वाजता टप्प्याने सुरळीत झाली. सात तास वीज गायब झाल्याने महावितरणच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी संताप व्यक्त केला. पुन्हा रात्री देखील काही काळ वीज पुरवठा खंडित झाला होता.

लोहगाव मध्ये वारंवार विजेची समस्या निर्माण होत आहे. सोमवारी पहाटे चार च्या सुमारास अंतर्गत मुख्य केबल मध्ये तांत्रिक बिघाड होऊन वीज पुरवठा खंडीत झाला. त्यानंतर त्याचा परिणाम दोन डीपी वर होऊन तारा तुटल्या गेल्या. त्यामुळे संत नगर,  दादाची वस्ती, कर्मभूमी नगर, पवार वस्ती, वाघोली रोड दोन्ही बाजूचा विद्युत पुरवठा खंडीत झाला. पहाटे ची वेळ असल्याने टीम पोहोचन्यास उशीर झाला. तीन ठिकाणचा बिघाड दुरुस्त करण्यात तब्बल सात तास लागला. त्यानंतर काही भागांचा टप्प्या टप्प्याने वीज पुरवठा सुरळीत झाला. सात तास वीज गेल्याने टाक्यांमध्ये पाणी चढवणे, मोबाईल चार्जिंग नसणे, वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या.

याबाबत गृहिणी रेखा दिपक खांदवे म्हणाल्या, सकाळी उठल्या पासुन लाईट नसल्याने घरातील कामे रखडली. शाळकरी मुलांना शाळेत जाण्यासाठी अडचणी झाल्या. वारंवार लाईट जात असल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत.

महावितरण धानोरी शाखेचे शाखा अभियंता राहुल बेंद्रे म्हणाले, तांत्रिक बिघाड झाल्याने सकाळी चार पासुन काही भागांचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. तात्पुरते दुसऱ्या लाईन वरून  जोडून देण्यास देखील अडचणी आल्याने काही तास नागरिकांना अडचणी निर्माण झाल्या. त्यानंतर बाहेरून टीम मागवून विद्युत पुरवठा सुरळीत केला.

नगर रोड विभागाचे कार्यकारी अभियंता पाटील म्हणाले, सकाळी अनेक ठिकाणचे कंडक्टर गेल्याने अडचण निर्माण झाली होती. त्यामध्ये एअर फोर्स एरिया, झाडे असल्यामुळं तारा जोडण्यास उशीर झाला असल्याचे सांगितले.

Download in JPEG format

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page