विविध नागरी प्रश्न मार्गी लावण्याची मागणी
एनसीपी (शरद पवार) पक्षाच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन

वाघोली : वाघोलीच्या नागरी प्रश्नासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
वाघोलीतील कचरा व्यवस्थापन, ड्रेनेज लाईन, रस्त्यातील खड्डे, वाहतूककोंडी, पाणीप्रश्न तसेच महामार्गावरील पथदिवे या प्रश्नावर पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्याशी चर्चा झाली. आयुक्तांनी तात्काळ संबंधित विभागाचे अधिकारी यांना बोलावून प्रश्न समजून घेऊन सोडविण्यास सांगितले. तसेच येणाऱ्या काळात वाघोलीला भेट देऊन भेडसावत असलेले प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत आयुक्तांनी आश्वासन दिले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर सरचिटणीस प्रकाश जमधडे, उपाध्यक्ष छबीन पटेल, प्रभाग अध्यक्ष विजय गोरे, प्रभाग सचिव विशाल राठोड, सामाजिक माध्यम प्रतिनिधी पुणे जिल्हा जाकीर पठाण आदी उपस्थित होते.