फुलमळा रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणासाठी प्रयत्न करणार – रामभाऊ दाभाडे

माजी जि.प. सदस्य रामभाऊ दाभाडे, निखील भाडळे व महेंद्र भाडळे यांचेकडून स्व:खर्चाने फुलमळा रस्त्याची मुरूम टाकून दुरुस्ती

वाघोली:  पावसामुळे भावडी-फुलमळा अतिशय दुरावस्था झाली आहे. सद्यस्थितीत कायमस्वरूपी उपाययोजना करणे शक्य नसल्याने वाघोली गावाचे जेष्ठ नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, सामाजिक कार्यकर्ते निखील भाडळे व माजी उपसरपंच महेंद्र भाडळे यांनी स्व:खर्चाने मुरूम टाकून रस्त्याची दुरुस्ती केली आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

दरवर्षी पावसाळ्यामध्ये भावडी-फुलमळा रस्त्याची अतिशय दुरावस्था होते. रस्त्यावर साचलेले मोठ्याप्रमाणावर पाणी, चिखल यामुळे या परिसरातील रहिवाशांसह शाळकरी मुले, जेष्ठ नागरिकांना मोठा सामना करावा लागतो. याही वर्षी रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे. चिखलमय झालेल्या रस्त्यातून व साचलेल्या पाण्यामधून नागरिकांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. रामभाऊ दाभाडे, सामाजिक कार्यकर्ते निखील भाडळे, माजी उपसरपंच महेंद्र भाडळे यांनी नागरिकांच्या उपस्थितीत रस्त्याची पाहणी करून स्व:खर्चाने मुरूम टाकून रस्त्याचा गंभीर प्रश्न मार्गी लावला आहे. काही प्रमाणात का होईना रस्त्याची समस्या सुटल्याने नागरिकांनी दाभाडे व भाडळे बंधू यांचे आभार मानले आहेत.

भावडी-फुलमळा रस्त्याची अतिशय दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांना गंभीर स्थितीचा सामना करावा लागत आहे. स्व:खर्चाने मुरूम टाकून तात्पुरती नागरिकांची अडचण दूर केली आहे. आमदार, खासदार, पीएमआरडीएच्या माध्यमातून फंड मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. फंड मिळाल्यास रस्त्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो. कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी लवकर शासकीय पातळीवर पाठपुरवा करून फुलमळा रस्त्याच्या  कॉंक्रीटीकरणासाठी प्रयत्न करणार आहे.

– रामभाऊ दाभाडे (माजी जिल्हा परिषद सदस्य, वाघोली)

Download in JPEG Format

Square logo
DB Team

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button