९० पेक्षा अधिक दाखल गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगार जेरबंद
गुन्हे शाखा युनिट-६ ची कामगिरी
पुणे : वेगवेगळ्या राज्यात ९० पेक्षा अधिक जबरी चोरी करणाऱ्या फरार अट्टल गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने वाघोली येथील चोखीदानी रोडवरील बजाज शोरूम जवळ जेरबंद केले आहे.
अच्युत सोमांना कुमार (वय ३४ रा. कोळीवाड, जि. धारावाड, हुबळी कर्नाटक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
चैतन्य पुरी (रजकोंडा हैद्राबाद) पोलीस स्टेशनसह विविध राज्यात ९० पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेला जबरी चोरी मधील फरार अट्टल चोरट्याचा हैदराबाद पोलिसांसह पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-६ चे पथक तांत्रिक विश्लेषण व बातमीदारमार्फत तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकातील पोलीस अंमलदार समीर पिलाने व बाळासाहेब तनपुरे यांना जबरी चोरीतील अट्टल गुन्हेगार वाघोली येथे चोखीदानी रोडवरील बजाज शोरूम जवळ असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून अट्टल चोरट्यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन चौकशी केली असता विविध गुन्हे केले असल्याची कबुली दिली.
सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर वेगवेगळ्या राज्यात जबरी चोरीचे एकूण ९० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यास पुढील कारवाई कामी चैतन्य पुरी पोलीस स्टेशन (रजकोंडा हैद्राबाद) पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहा पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली युनिट सहाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक अजय वाघमारे (गुन्हे शाखा), रमेश मेमाणे, नितीन मुंढे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, समीर पिलाने, ऋषिकेश व्यवहारे, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, गणेश डोंगरे, कीर्ती मांदळे, सुहास तांबेकर यांनी केली आहे.