Video : खोपोली घाटाजवळ खासगी बसला आग
सुदैवाने जीवितहानी टळली; प्रवाशांचे सामान जळून खाक
पुणे : खोपोली घाटाजवळ बेंगलोरहून जयपूरला जाणाऱ्या खासगी बसला आग लागली. बसला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. आगीच्या घटनेमुळे वाहनांच्या ५ किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या.
बसमध्ये दोन चालक, एक क्लीनर व ३० प्रवासी होते. सर्व प्रवासी वेळीच बाहेर उतरल्याने जिवीतहानी टळली असून प्रवाशांचे सामान जळून खाक झाले आहे.