अवैध दारु निर्माती व विक्रीवर छापेमारी

दारुबंदी सप्ताह निमित्त राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकाची विशेष मोहीम

वाघोली : दारूबंदी सप्ताह निमित्त निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक पुणे विभागाच्या वतीने अवैध दारू निर्मिती, वाहतूक व विक्रीवर आळा घालण्यासाठी धडक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागीय उप आयुक्त सागर धोमकर यांच्या आदेशानुसार विभागीय भरारी पथक राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक नरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दारुबंदी सप्ताह निमीत्त अवैध दारु निर्माती, वाहतुक व विक्रीवर आळा घालण्याच्या दृष्टीने दिनांक विशेष मोहिम आखून पुणे जिल्हयातील अवैध गावठी हातभटटी दारु निर्माती, वाहतूक व विक्री तसेच अवैधरित्या मद्य विक्री होत असलेल्या ढाब्यांवर पथकाने सातत्याने छापे मारी सुरु केली आहे. शिंदवणे, भरतगाव, आंबळे, पिसर्वे ,जेजुरी, खामगाव, हिंजेवडी, माणगाव, बोपखेल, दिघी, वाडेगाव, शिक्रापूर, राहू, फुरसुंगी, वाघोली, सोरतापवाडी, डाळिंब आदी ठिकाणी कारवाई करण्यात आली. छापेमारीत एकुण २२ गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यामध्ये १८ वारस व ४ बेवारस गुन्हांचा समावेश आहे.

सदर गुन्हयांमध्ये एकुण १४ आरोपीच्या विरुध्द गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. गुन्हयांमध्ये १४ हजार ४०० लिटर रसायन, २ हजार ११५ लिटर गावठी हातभट्टी दारु, ४० ब. लि. देशी दारु, १० ब. लि. विदेशी मद्य, १६ ब. लि. बिअर तसेच अवैधरित्या दारु वाहतूक करणारी चारचाकी वाहन १, तीन चाकी १ व दुचाकी वाहने ४ असा एकुण ६ वाहनांसह अंदाजे १७,२७,१६० किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. यापुढे देखील अशाच प्रकारच्या मोहिमा आखून अवैध दारु व्यवसाय करणाऱ्यांवर सात्यत्याने छापे मारुन कारवाई करण्यात येणार आहे.

सदरची कारवाई दुय्यम निरीक्षक अतुल पाटील, विराज माने व धीरज सस्ते तसेच जवान पी. टी. कदम, आर. जे. चव्हाण, ए. आर. थोरात, एस. एस. पोंधे, एस. सी. भाट, आर. टी. ताराळकर, ए. आर. दळवी यांनी केली आहे. पुढील तपास निरीक्षक नरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक ए. बी. पाटील, व्हि. एम. माने व डी. एम. सस्ते करीत आहेत.

Download in JPEG format

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button