अभिलेखावरील सराईतास अटक
चंदननगर पोलीस तपास पथकाची कामगिरी; पिस्टलसह पाच काडतूस जप्त
चंदननगर : अभिलेखावरील सराईतास चंदननगर पोलिस तपास पथकाने सुंदराबाई शाळा परिसरात सिने स्टाईल पाठलाग करून पकडले. त्याचेकडून देशी बनावटीच्या पिस्टलसह पाच पितळी धातूचे काडतुसे जप्त करण्यात आली.
समाधान लिंगाप्पा विभुते (वय ३२ रा. मु.पो. पळशी सुपली ता. पंढरपुर जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी (दि.६ ऑक्टोबर) चंदननगर पोलीस स्टेशनचे तपास पथक हद्दीत गस्त घालत असताना अभिलेखावरील सराईत सुंदराबाई शाळा परिसरात पिस्टल विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती गोपनीय बातमीदारामार्फत पोलीस अंमलदार श्रीकांत कोद्रे, पोलीस अंमलदार सुरज जाधव यांना मिळाली. त्यानुसार चंदननगर पोलीस तपास पथकाने सदर ठिकाणी सापळा लावला. परंतु सराईतास पोलीस आल्याची चाहूल लागताच येथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तपास पथकाने सिने स्टाईल पाठलाग करून पकडण्यात यश मिळवले. त्याला ताब्यात घेवून झडती घेतली असता त्याचेकडे काळया रंगाच्या सॅकबॅगमध्ये देशी बनावटीचा पिस्टल व पितळी धातुची के एफ ७.६५ ची काडतुसे मिळून आली. एकूण ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चंदननगर पोलीस ठाण्यात रतीय हत्यार अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे करीत आहे.
सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त हिम्मत जाधव, सहा. पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने, चंदननगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे, पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक राहुल कोळपे, पोलीस अंमलदार रामचंद्र गुरव, विश्वनाथ गोणे, नानासाहेब पतुरे, महेश नाणेकर, सचिन रणदिवे, शिवाजी धांडे, श्रीकात कोद्रे, सुरज जाधव, शेखर शिंदे, विकास कदम, प्रफुल मोरे, नामदेव गडदरे, सचिन पाटील, अमोल जाधव यांनी केली आहे.