कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर कारवाई करा

महाराष्ट्र भाजप युवा मोर्चाच्या वतीने लोणीकंद पोलिसांना निवेदनाद्वारे मागणी

वाघोली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल महाराष्ट्र भाजप युवा मोर्चाच्या वतीने लोणीकंद शहर पोलिसांना निवेदनाद्वारे पटोले यांचेवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. वाघोली पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस कर्मचारी बाळासाहेब हराळ यांना भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र युवा मोर्चा प्रदेश सचिव गणेश बापू कुटे, हवेली भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष राहुल कुटे, हवेली तालुका उपाध्यक्ष प्रदीप सातव पाटील, तुषार कुटे, अविनाश कुटे, मनोज कुटे, अजित कुटे, विशाल नाना कुटे, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. नाना पटोले यांनी पंतप्रधानाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे सर्वसामान्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. विकृत मानसिकता असणाऱ्या पटोले यांची पदावरून हकालपट्टी करण्यात यावी.

– गणेश कुटे (भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव)

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button