Trending

भाजप युवा मोर्चा राज्य सचिवपदी गणेश बापू कुटे यांची निवड

भाजप युवा मोर्चा राज्य अध्यक्ष विक्रांत दादा पाटील यांनी घेतली कुटे यांच्या कार्याची दखल

वाघोली :  आव्हाळवाडी (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे सदस्य गणेश बापू कुटे यांची भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी निवड झाली आहे. नुकतेच कुटे यांना निवडीचे पत्र भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विक्रांत दादा पाटील यांनी दिले आहे.

आव्हाळवाडी येथील रहिवाशी असलेले गणेश बापू भगवान कुटे यांनी हवेली तालुका भाजपचे दोन वेळा अध्यक्ष पद भूषविले आहे. कुटे हे राजकीय घडामोडींचे साक्षीदार असून जिल्ह्यातील सर्वात मोठा भाजप पक्ष प्रवेश सोहळा कुटे यांच्या काळात  संपन्न झाला आहे. पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देखील कुटे अतिशय चांगली बजावली. त्याचबरोबर आपल्या कार्यातून पक्षाचे ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविले. राज्य कार्यकारिणी युवा मोर्चाचे सदस्य झाल्यापासून विक्रांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर दौरे करून युवकांचे संघटन करण्यात कुटे यांचा मोलाचा वाटा आहे. सामन्यांच्या प्रश्नांची जाण असणारा पदाधिकारी म्हणून कुटे यांची ओळख आहे. पक्षाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विविध आंदोलनात कुएत यांचा सहभाग राहिला आहे. त्यांच्या सामाजिक व पक्ष वाढीसाठी केलेल्या कार्याची भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विक्रांत दादा पाटील यांनी विशेष दखल घेऊन गणेश बापू कुटे यांचेवर भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिवपदाची जबादारी सोपवली आहे. हवेली तालुक्यातून राज्याच्या युवा मोर्चा कार्यकारणीवर सचिव पदाचा मान मिळवणारे कुटे हे एकमेव पदाधिकारी ठरले आहेत. महाराष्ट्र प्रदेश भाजप युवा मोर्चा अध्यक्ष विक्रांत दादा पाटील यांच्या हस्ते गणेश कुटे यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

यावेळी अविनाश कुटे, विशाल कुटे, तुषार कुटे, मनोज कुटे आदी मान्यवर उपस्थित होते. निवडीबद्दल आमदार राहुल कुल, भाजप नेते प्रदीपदादा कंद, रोहिदास उंद्रे, संदीप भोंडवे, किरण दगडे, संदीप सातव, विजय  जाचक, प्रदीप सातव पाटील, शरद आव्हाळे, गणेश सातव, शिवाजी गोते आदींनी अभिनंदन केले आहे.

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button