वाघोलीतील दुचाकी चोरटा जेरबंद
लोणीकंद तपास पथकाची कारवाई; दुचाकी चोरीचे ५ गुन्हे उघडकीस
वाघोली : चोरलेली स्प्लेंडर दुचाकी विकण्याच्या तयारीत असणाऱ्या वाघोलीतील एकास लोणीकंद पोलिसांनी येवले चहाजवळ अटक केली असून त्याच्याकडून लोणीकंद येथील दुचाकी चोरीचा तसेच इतर पोलीस स्टेशनमधील ४ असे एकूण ५ दुचाकी चोरीचे गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत.
देविदास सुभाष दहिफळे (रा. बकोरीफाटा, वाघोली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली (ता. हवेली) येथील येवले चहाजवळ एक तरुण स्प्लेंडर दुचाकी लोकांना विकत घेता का असे विचारत असल्याची माहिती लोणीकंद पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ त्याठिकाणी जावून संशयित तरुणाला तरुण ताब्यात घेतले. दुचाकीबाबत पोलिसांनी विचारणा केली असता संशयिताने उडवाउडवीची दिली. त्याला विश्वासात घेतल्यानंतर लोणीकंद येथील आपले घर सोसायटीमधून स्प्लेंडर दुचाकी चोरली असल्याचे सांगितले. तपास पथकाने त्याच्याकडे अधिक तपास केला असता चिखली, चंदननगर, भोसरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चार दुचाकी चोरलेल्या असल्याचे निष्पन्न झाले. तपास पथकाने दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून ४ दुचाकी जप्त केल्या आहेत. अधिक तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त रोहिदास पवार, सहा. पोलीस आयुक्त किशोर जाधव, लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश तटकरे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक निखिल पवार, तपास पथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक सुरज गोरे, सहा. फौजदार मोहन वाळके, पोहवा. बाळासाहेब सकाटे, पोना विनायक साळवे, कैलास साळुके, अजित फरांदे, पोलीस अंमलदार समीर पिलाणे, बाळासाहेब तनपुरे, पांडुरंग माने, सागर शेडगे, अमोल ढोणे यांनी केली आहे.