पुणे-नगर रस्त्यावरील दुभाजकाच्या कामास सुरुवात
भाजप क्रीडा आघाडी व जनता युवा मोर्चाच्या मागणीला यश
वाघोली : पुणे-नगर महामार्गावरील दुभाजकाचे काम सुरु करावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल अशा इशारा भारतीय जनता युवा मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष गणेश सातव व भाजप क्रीडा आघाडीचे हवेली तालुकाध्यक्ष विजय जाचक यांनी एका निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला होता. दुभाजकाचे काम सुरु करण्यात आले असून भाजप क्रीडा आघाडी व जनता युवा मोर्चाच्या मागणीला यश आले आहे.
पुणे-नगर महामार्ग रुंदीकरणाचे काम चालू असून दुभाजक उंची अतिशय कमी झाल्यामुळे छोट्यामोठ्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वाहनधारक दुभाजकाची उंची कमी असल्यामुळे वाटेल तेथून अचानक घुसखोरी करता. एका लेन वरून दुसऱ्या लेनवर अचानक वाहन आल्यामुळे अन्य वाहनधारकांना वेगावर नियंत्रण मिळवणे कठीण होते, अशावेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुणे-नगर महामार्गावरील दुभाजकाचे काम लवकरात लवकर सुरु करावे अन्यथा भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारतीय जनता युवा मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष गणेश सातव व भाजप क्रीडा आघाडीचे हवेली तालुकाध्यक्ष विजय जाचक यांनी एका निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला होता. दुभाजकाचे काम सुरु झाल्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांमधून समाधान व्यक्त केल्या जात आहे.
पुणे-नगर महामार्गावरील दुभाजकाचे काम सुरु करावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला होता. आंदोलनाचा इशारा देताच संबधित विभागाने दुभाजकाचे काम सुरु केले असून भाजपच्या मागणीला यश मिळाले आहे.
– विजय जाचक (हवेली तालुकाध्यक्ष, भाजप क्रीडा आघाडी)
– गणेश सातव (पुणे जिल्हा उपाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा)