मांजरी खुर्दच्या सरपंचपदी स्वप्नील उंद्रे
बिनविरोध निवड झाल्याबद्दल भाजप युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आला सत्कार
वाघोली : पुणे शहर भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष तथा मांजरी खुर्द ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य स्वप्नील दत्तात्रय उंद्रे यांची मांजरी खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे.
स्वप्नील उंद्रे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य गणेश बापू कुटे, पुणे जिल्हा युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदीप सातव, भाजप आघाडी पुणे जिल्हा उपाध्यक्ष जयप्रकाश सातव, भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष गणेश सातव, भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष शरद आव्हाळे, भाजप क्रीडा आघाडी हवेली तालुकाध्यक्ष विजय जाचक, हवेली तालुका उपाध्यक्ष प्रदीपदादा सातव पाटील, सामाजिक कार्यकर्ते माऊली उंद्रे यांनी सत्कार केला. मांजरी गावातील नागरिकांचे मुलभूत प्रश्न मार्गी लावणार असून गाव हायटेक बनविण्यासाठी प्रयत्नशी राहणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित सरपंच उंद्रे यांनी याप्रसंगी दिली.