गलांडे, जऱ्हाड भाजप मध्येच थांबणार
![](https://deccanbulletin.in/wp-content/uploads/2024/09/combined-780x470.jpg)
वडगावशेरी : आपण शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार नसून भाजप मध्येच थांबणार असल्याची माहिती माजी नगरसेवक संदीप जऱ्हाड आणि माजी नगरसेविका सुनीता गलांडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
वडगावशेरी मतदार संघात माजी आमदार बापुसाहेब पठारे यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर येत्या २७ तारखेला शरद पवार हे मेळावा घेणार आहेत. त्या मेळाव्यात दहा माजी नगरसेवक प्रवेश करतील असा दावा केला होता. यामध्ये भाजपच्या माजी नगरसेवकांचा देखील समावेशाबाबत दावा केला होता. कोण कोण माजी नगरसेवक प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाली. यामध्ये माजी नगरसेवक संदीप जऱ्हाड, माजी नगरसेविका सुनीता गलांडे हे देखील प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. तशा बातम्या प्रसिध्द झाल्या होत्या. यानंतर या दोघांनाही वरीष्ठ नेत्यांनी विचारणा केल्यानंतर त्यांनी आपण भाजपमध्ये थांबणार असल्याचे पत्रकारांना माहिती दिली. जऱ्हाड आणि गलांडे यांनी तर प्रवेश करण्यास सद्या तरी नकार दिला आहे. अन्य माजी नगरसेवक, पदाधिकारी प्रवेश करणार की थांबणार हे २७ तारखेला स्पष्ट होणार आहे.