यशवंत सुरू करण्याचा शब्द पूर्ण करणार – आमदार कटके
हवेलीत आभार दौऱ्यात केला विश्वास व्यक्त
पुणे : यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू होण्यासाठी संचालक मंडळाची अजित पवार यांच्याशी सकारात्मक बोलणी सुरू आहे. संचालक मंडळाला पूर्ण सहकार्य करण्याचे अश्वासक त्यांनी दिले आहे. संचालक मंडळानी काही वित्तीय संस्थांशी एकरकमी कर्ज फेडीसाठी स्वागतार्य प्रयत्न केले आहेत. उर्वरीत सर्व प्रश्न अजित पवार यांच्या माध्यमातून सोडवून कारखाना सुरू करण्यासाठीचा शब्द पूर्ण करु असा विश्वास शिरुर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी व्यक्त केला आहे.
हवेली तालुक्यात आयोजित केलेल्या आभार दौऱ्यात आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी उरुळीकांचन येथे बोलताना हा विश्वास व्यक्त केला आहे.
आमदार ज्ञानेश्वर कटके म्हणाले की, हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने आपला हक्काचा कारखाना सुरू व्हावा अशी मागणी आहे. या मागणीला तालुक्याचा भूमीपूत्र म्हणून मी अजित पवार यांच्याकडे ही मागणी लावून धरणार आहे.
अजित पवार यांनी कारखाना प्रश्नात संचालक मंडळाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार संचालक मंडळ त्यांच्या माध्यमातून काही मदत घेत आहे. संचालक मंडळानेकाही बँकांशी एकरकमी कर्ज फेड केली आहे. उर्वरीतनिर्णय अजित पवार यांच्या माध्यमातून घेऊन कारखाना सुरू करण्यासाठी निश्चित यश मिळेल असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला.
दरम्यान या सत्कार कार्यक्रमास राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, हवेली बाजार समिती संचालक राजाराम कांचन, प्रशांत काळभोर, सरपंच अमित (बाबा) कांचन, राष्ट्रवादी प्रदेश सचिव गुलाब चौधरी, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब महाडीक, अजिंक्य कांचन, यशवंतचे संचालक संतोष कांचन, माजी सरपंच संतोष उर्फ पप्पू कांचन, राजेंद्र कांचन, युवराज कांचन, भाऊसाहेब तुपे, सुभाष बगाडे उपस्थित होते.
पुणे-सोलापूर, पुणे-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील प्रस्तावित असलेल्या इलिव्हेटेड मार्गांच्या कामांना गती देऊन वाहतुक कोंडी समस्या सोडविण्यासाठी प्रथम प्राधान्य राहणार आहे. केंद्रात व राज्यात एक सरकार असल्याने या कामांना पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार.
– ज्ञानेश्वर आबा कटके (आमदार, शिरूर-हवेली)