पिस्तुल सह जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी एकास अटक
गुन्हे शाखा युनिट-६ ची कामगिरी; आर्म अॅॅक्ट नुसार गुन्हा दाखल

पुणे : देशी बनावटीचे गावठी पिस्तुल सह जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी वाघोलीतील रानवारा हॉटेल जवळ रस्त्यालगत थांबलेल्या एकास युनिट सहाच्या गुन्हे शाखा पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली आहे. त्याच्याकडून पिस्तुल व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून त्याचेविरुद्ध भारतीय हत्यार बंदी कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुधिर भोला पुरबे (वय २६ रा. साई सत्यम पार्क, टाटा शोरूम जवळ, वाघोली ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट-६ चे पथक शनिवार (दि. ४ सप्टेंबर) रोजी गस्तीवर असताना वाघोली येथील रानवारा हॉटेल जवळ एक इसम थांबला असून त्याचे जवळ पिस्तुल असल्याची माहिती बातमीदारामार्फत पोना रमेश मेमाणे व पोना बाळासाहेब सकाटे यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-६ चे सहा. पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोशि ऋषिकेश ताकवणे, पोशि ऋषिकेश व्यवहारे, पोशि सचिन पवार यांनी त्याठिकाणी जावून खात्री केली असता एक इसम संशयितरित्या उभा असलेला दिसला. त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याचेकडे एक देशी बनावटीचा गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतूस मिळून आले. याप्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशनला त्याचे विरुद्ध आर्म अॅॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहा. पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट सहाचे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहा. पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोह मचिंद्र वाळके, पोना नितिन शिंदे, पोना नितीन मुंढे, पोना कानिफनाथ कारखेले, पोना प्रतीक लाहीगुडे, पोना रमेश मेमाणे, पोना संभाजी सकाटे, पोना कळंबे, पोशि ऋषिकेश व्यवहारे, पोशि ऋषिकेश ताकवणे, पोशि सचिन पवार, पोशि ऋषीकेश टिळेकर, पोशि शेखर काटे, पोशि नितिन धाडगे, पोशि काळे व पोना सुहास तांबेकर यांनी केली आहे.