भाविकांना दर्शनासाठी मंदिरे सुरु करण्याची मागणी

वाघोली येथील वाघेश्वर मंदिरासमोर भाजप वाघोली शहरच्या वतीने शंखनाद आंदोलन

Story Highlights
  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कि हिरक महोत्सव वर्षे माहित नसल्याने भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वाघोलीतून स्मरणपत्रे पाठवण्यात आले.

वाघोली  :  मंदिरे दर्शनासाठी खुली करावे या मागणीसाठी महाविकास आघाडी सरकार विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने वाघोली (ता. हवेली) येथील वाघेश्वर मंदिरासमोर शंखनाद आंदोलन करण्यात आले.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे पहिल्या लॉकडाऊनपासून बंद करण्यात आलेली मंदिरे अद्यापही उघडलेली नाहीत. मंदिरे खुली करून भाविकांना दर्शनासाठी परवानगी द्यावी अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. सरकारकडून गर्दीचे कारण पुढे करून मंदिरे उघडण्यात परवानगी नाकारली जात आहे. कोरोनाचे दहिहंडी उत्सव साजरा करण्यावर देखील बंदी आणणल्याने भाजप चांगले आक्रमक झाले आहे. कृष्ण जन्माष्टमीनिमित्त राज्यात भाजपने मंदिरे उघडण्यासाठी पुन्हा एकदा शंखनाद आंदोलनाची हाक दिली आहे.

भारतीय जनता पार्टी वाघोली शहरच्या वतीने सोमवार (३० ऑगष्ट) रोजी वाघोली येथील वाघेश्वर मंदिरासमोर शंखनाद आंदोलन करण्यात आले. कोरोनाचे कारण पुढे करून सर्वसामान्य नागरिकांची राज्य सरकार मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

वाघेश्वर मंदिरासमोर शंखनाद आंदोलन करताना भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व भजनी मंडळी

देव, देवतांचे मंदिर पुजा अर्चना, कीर्तन, भजन व दर्शनासाठी सुरु करावे अशी मागणी करत भजनी मंडळींच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सातव, युवा मोर्चा हवेली तालुकाध्यक्ष अनिल सातव पाटील, भारतीय जनता पार्टीचे वाघोली शहराध्यक्ष केतन जाधव, वारकरी, भाविक, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button