रोहीत्रामधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

लोणीकंद शहर तपास पथकाची उल्लेखनीय कामगिरी

वाघोली : कोलवडी, बकोरी, फुलगाव परिसरात विद्युत रोहित्र फोडून त्यातील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी लोणीकंद शहर तपास पथकाने पकडली आहे. त्यांचेकडून पाच लाख अडोतीस हजार पाचशे रुपये किंमतीचा सातशे किलो तांबा धातूचा माल हस्तगत केला असून एकूण दहा रोहित्र चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. चार आरोपीसह चोरीचा माल घेणाऱ्या भंगार दुकानदारास अटक करण्यात आली आहे.

मुकेश प्रल्हाद पटेल (वय १९), अली तसब्बर खान (वय १९), अल्ताफ अन्वर (वय २३), हरिगोबिंद तुळशीराम चौधरी (वय २३ सर्व रा. वेळु ता. भोर, मुळगाव उत्तरप्रदेश) या चार आरोपींसह भंगार दुकानदार (रा. कात्रज) धिरज अशोक जैन याला अटक केली आहे.

याबात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत लोणीकंद तपास पथक गस्तीवर असताना तपास पथक प्रभारी पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे व पोलीस अंमलदार समीर पिलाने यांना गोपनीय बातमीदाराकडून रोहीत्रामधील तांब्याच्या तारांची चोरी करणारे चार इसम हे लोणीकंद येथील पावर हाउस जवळील विद्युत ट्रान्सफॉर्मरलगत आळंदी रोड येथे थांबले असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच तपास पथकाने त्याठिकाणी जाऊन खात्री केली असतात येथे चार संशयित इसम वावरत असल्याचे दिसले. तपास पथकाने चारही संशयितांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. सखोल चौकशी करून त्यांचेकडे असलेल्या दुचाकीची तपासणी केली असता डिक्कीमध्ये हातोडे, छन्नी, स्क्रू ड्रायव्हर, एक्सा ब्लेड, कटर, विविध स्पॅनर असे मोठ्याप्रमाणावर साहित्य आढळून आले. चौकशी दरम्यान कोलवडी, बकोरी, फुलगाव सह सासवड, राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत  रोहीत्रांची चोरी केली असल्याची आरोपींनी कबुली दिली.

दहा गुन्हे केल्याचे निष्पन्न :

लोणीकंद शहर पोलीस हद्दीमधील बकोरी, कोलवडी, फुलगाव येथे ७ गुन्हे, सासवड पोलीस स्टेशन हद्दीत १ व राजगड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये २ असे एकूण १० गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून ७०० किलो तांबा धातू ५ लाख ३८ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल कात्रज येथील भंगारच्या दुकानामधून जप्त केला आहे. पुढील तपास लोणीकंद शहर पोलीस करत आहेत.

सदर कामगिरी पुर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त चव्हाण, परीमंडळ-४ चे पोलीस उपआयुक्त पंकज देशमुख, सहा. पोलीस आयुक्त जाधव, लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस निरीक्षक वेताळ यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रभारी पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे, सहा. फौजदार मोहन वाळके, पोना कैलास साळुके, पोना विनायक साळवे, पोना अजित फरांदे, पोलीस अंमलदार समीर पिलाणे, सागर कडु, बाळासाहेब तनपुरे यांनी केली आहे.

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button