शेतकऱ्यांना योग्य न्याय द्या
योगीराज शिंदे यांची पीएमआरडीएकडे निवेदनाद्वारे मागणी
वाघोली : पुणे महानगर विकास प्राधिकरण विकास महामंडळ (पीएमआरडीए) कडून टाकण्यात आलेल्या चुकीच्या आरक्षणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यावा अशी मागणी हवेली तालुका महामंत्री युवा मोर्चाचे योगीराज शिंदे यांनी पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे यांच्याकडे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. शेतकऱ्यांना योग्य न्याय न मिळाल्यास पीएमआरडीए कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा नांगर फिरवू असा इशारा भाजप युवा मोर्चा हवेली तालुका महामंत्री योगीराज शिंदे यांनी यांनी दिला आहे.
पीएमआरडीएने टाकलेल्या चुकीच्या आरक्षणामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यावा अन्यथा गिरीश बापट, बाळाभाऊ भेगडे, गणेश भेगडे, प्रदीपदादा कंद, दादासाहेब सातव पाटील, भैरवी पलांडे, सुनील कांचन, किरण दगडे, रवींद्र कंद, संदीप सातव, श्याम गावडे, अनिल सातव, संतोष लोखंडे, उमेश लोखंडे, संतोष झुरंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएमआरडीए कार्यलयासमोर शेतकऱ्याचा नांगर फिरवून आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हाच्या वतीने देण्यात आला आहे.