वाऱ्यासह अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील तात्काळ पंचनामे करा

जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

पुणे  :  जुन्नर तालुक्यात २३ ते २५ जुलै रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील पंचनामे तात्काळ करून नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अति पाऊस व वादळी वाऱ्यामुळे आदिवासी भागातील कोल्हेवाडी, खिरेश्वर, करंजाळे, खामगाव, शिरोली तर्फे कुकडनेर, घाटघर, येणेरे, खानगाव, सुकाळवेढे, तळेराण, कोपरे, मांडवे या भागात घरांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच वादळामुळे महावितरणचे अनेक ठिकाणी मोठ्याप्रमाणावर विद्युत पोलही पडले आहेत. या वादळामध्ये माणिकडोह, अजनावळे, खामुंडी, कोपरे या भागातील अंगणवाडी, शाळा, समाज मंदिरे यांचे नुकसान झाले आहे. अति पावसामुळे व वादळाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे तालुक्यातील अनेक रस्त्यांची अतिशय दुरावस्था झालेली आहे. तसेच कोल्हेवाडी व खामगाव मांगणेवाडी येथील भूस्खलन बाबत सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. अति पावसामुळे व वादळाने नुकसान झालेल्या परिसराची स्वतः अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केलेली असून जुन्नर तालुक्यातील अति पावसाने व वादाळाने नुकसान झालेल्या भागातील पंचनामे तात्काळ करून नुकसानग्रस्तांना मदत करण्याची मागणी आमदार अतुल बेनके यांनी केली आहे.

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button