कोयत्याने सपासप वार करून मांजरीत खून
गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने चौघांना तर एकास लोणीकंद तपास पथकाने केली अटक
- गुन्हे शाखा युनिट सहाच्या तत्परतेमुळे आरोपी ताब्यात... गुन्हे शाखा युनिट सहाचे पथक लोणीकाळभोर पोलीस स्टेशनमध्ये दाखल चेन स्नॅचिंग गुन्हयाच्या तपासकामी खासगी वाहनाने पेट्रोलींग करीत होते. दरम्यान मांजरी स्मशानभुमी जवळ काळुबाई मंदीराचे बाजुला एका इसमाचा खून झाला असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच युनिट सहाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी पोलीस शिपाई ऋषिकेश ताकवणे व ऋषिकेश व्यवहारे यांना खून करणारे इसम वेरना कारमधून केसनंद गावाच्या दिशेने जात असल्याची खात्रीशीर मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी पोशि ऋषिकेश ताकवणे, पोशि ऋषिकेश व्यवहारे, पोशि सचिन पवार यांचे एक पथक व पोना नितीन मुंढे, पोना कानिफनाथ कारखेले, पोना नितीन शिंदे यांचे दुसरे पथक तयार करून योग्य सुचना देवून एक पथक लोणीकंद व दुसरे पथक केसनंद गावच्या दिशेने विनाविलंब रवाना केले. खंडोबा माळ लोणीकंद येथे सदर वेरना कार जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी कार थांबवली असता आरोपी कार मधून बाहेर पडून पळून जात असताना ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार या पथकाने चार जणांना पकडले.
पुणे : जुन्या भांडणाच्या व पैशाच्या वादातून तरुणाचा कोयत्याने सपासप वार करून तसेच दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना मांजरी खुर्द येथील स्मशानभूमीजवळ रविवारी (दि.१) रात्री सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडली. खुनाचा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने चौघांना अटक केली आहे तर एकास लोणीकंद तपास पथकाने अटक केली आहे.
विकास लक्ष्मण सोनवणे (रा. मांजरी खुर्द) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे तर हेमंत किसन मोरे, गोविंद बाबासाहेब बनसोडे, शुभम अशोक गायकवाड, अभिजीत उर्फ नाना सुखराज महाले, तेजस रमेश मोरे (सर्वजण रा. शिवशंभो नगर, मांजरी खुर्द) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी माऊली सम्राट मुरकुटे (रा. मांजरी खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनवणे व मुरकुटे नातेवाईक आहेत. रविवारी रात्री दोघेही दुचाकीवरून एका मित्राच्या घरी पूजेसाठी केले होते त्यावेळी अमोल गायकवाड यांनी सोनवणे यांना फोन केला. हेमंत मोरे व माझी भांडण झाले असून उसने दिलेले पैसे देत नाही तु लवकर ये असे गायकवाड यांनी फोनवर सांगितले. त्यानंतर तात्काळ सोनवणे व फिर्यादी तिकडे गेले. हेमंत मोरे, गोविंद बनसोडे हे रस्त्यात भेटले त्यांनी हा विषय मिटवून टाकू म्हणून सर्वजण मांजरी स्मशानभूमीजवळ काळूबाई मंदिराच्या मागे गेले असता त्याठिकाणी उसने पैसे यावरून त्यांच्यात वादावादी सुरू झाली. मुरकुटे यांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला पण मोरे याने त्यालाच मध्ये बोलू नको असे दमदाटी केली, वाद हल्लेखोरांनी कोयत्याने विकास सोनवणे यांच्यावर वार केले, त्यावेळी मुरकुटे यांनी अडवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना देखील यात जखम झाली. त्यानंतर कोयत्याने व दगडाने वार करुन विकासचा खून केला. मुरकुटे व इतर जण घाबरून पळून गेले होते दरम्यान पथके तयार करून पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
चार आरोपींना गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाने तर एका आरोपीला पोलीस उपआयुक्त पंकज देशमुख, सहा. पोलीस आयुक्त जाधव, लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रभारी पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे, सफौ मोहन वाळके, पोना अजित फरांदे, पोना कैलास साळुंके, पोना विनायक साळवे, पोलीस अंमलदार समीर पिलाने, सागर कडू, बाळासाहेब तनपुरे या पथकाने अटक केली आहे.
सदरची कामगिरी पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे शाखा) श्रीनिवास घाडगे, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा), लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने, सपोनि नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, प्रतिक लाहिगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर, तांत्रिक विश्लेषण विभागाचे सलीम तांबोळी यांचे पथकाने केली आहे.