भाजपच्या वतीने चर्चा सत्र व वाघोली शहर बूथ बैठक
मा. स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांच्या उपस्थितीत संपन्न
वाघोली : वाघोली येथील समस्या सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने महापालिकेतील अधिकाऱ्यांबरोबर ग्रामस्थांचे चर्चासत्र व वाघोली शहर बूथ बैठक तसेच संवाद सत्राचे वाघोली शहर प्रमुख केतन जाधव यांच्या आयोजनाखाली मा. स्थायी समितीचे अध्यक्ष नगरसेवक (प्रभारी वाघोली शहर) योगेश मुळीक यांच्या उपस्थितीत पार पडली.
वाघोली येथील मुलभूत समस्यांबाबत नगरसेवक योगेशजी मुळीक यांच्या समवेत शनिवार (दि. ७ ऑगष्ट) रोजी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर वाघोलीत मूलभूत समस्या नागरिकांनी मांडल्या. नगरसेवक योगेश मुळीक यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यान महानगरपालिका वाघोली संपर्क अधिकारी प्रमोद मुळे, आरोग्य अधिकारी समीर खुळे यांना वाघोलीतील समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी सूचना केल्या. बैठकीमध्ये प्रामुख्याने वाघोलीत रस्त्यांची डागडुजी, कचरा उचलणे, पाणी पुरवठा नियोजन, पथदिवे दुरुस्ती तसेच डासांच्या वाढत्या प्रमाणामुळे डेंगू रुग्णांचे वाढते प्रमाण आदि समस्या नागरिकांनी मांडल्या. वाघोलीमध्ये टप्याटप्याने धूर फवारणी करण्यात यावी, जन्म मृत्यू प्रमाणपत्र जलतगतीने देण्यात यावे अशा सूचना मुळीक यांनी संबधित अधिकाऱ्यांना केल्या. तसेच अधिकाऱ्यांनी वाघोली येथील कार्यालयात दररोज उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या सोडवण्याबाबत सूचना केल्या.
या बैठकीला भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष दादासाहेब सातव पाटील, पुणे जिल्हा सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे, व्यापारी आघाडी अध्यक्ष जयप्रकाश सातव, युवा मोर्चा सरचिटणीस संदीप सातव, जिल्हा क्रीडा उपाध्यक्ष गणेश सातव, हवेली तालुका क्रीडा अध्यक्ष विजय जाचक, भाजप युवा मोर्चा हवेली तालुकाध्यक्ष अनिल सातव पाटील, भाजप वाघोली शहर अध्यक्ष केतन जाधव, महानगरपालिका सहाय्यक आयुक्त सुहासजी जगताप, संपर्क अधिकारी उपअभियंता प्रमोद मुळे, विभागीय आरोग्य निरीक्षक शंकर जगताप, आरोग्य निरीक्षक समीर खुळे, वाघोली ग्रामस्थ शहर बुथ प्रमुख भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी माध्यमातून वाघोलीतील नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
– केतन जाधव (भाजप शहर अध्यक्ष, वाघोली)