Video : वाघोली येथे स्क्रॅपच्या दुकानाला आग
अग्निशामक दलाच्या जवानांनी अर्ध्या तासात आग आणली आटोक्यात

वाघोली : वाघोलीतील बकोरी फाट्याजवळील जाधव वस्ती येथील परफेक्ट वजन काट्या मागे असलेल्या स्क्रॅपच्या दुकानाला आग लागल्याची घटना शुकवारी (दि. १५ मार्च) सायंकाळी चारच्या सुमारास घडली.
आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. आगीची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी व वाघोली पीएमआरडीए अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. वाघोली पीएमआरडीएच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी दोन वाहनांनी अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. आगीत स्क्रॅपच्या दुकानातील साहित्य जळून खाक झाले आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने आगीच्या घटनात वाढ झाली आहे.