शिंदेवाडी ते हिंगणगाव रस्त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न चिन्ह
रयत शेतकरी संघटनेची खासदार डॉ. कोल्हे व आमदार अॅॅड. पवार यांच्याकडे लेखी तक्रार

वाघोली : शिंदेवाडी ते हिंगणगाव चालू असून असलेल्या रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत रयत शेतकरी संघटनेने प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. संबधित ठेकेदाराला रस्त्याचे काम दर्जेदार करण्याबाबत सूचना कराव्या अशी लेखी मागणी रयत शेतकरी संघटनेच्या वतीने खासदार डॉ. अमोल कोल्हे व शिरूर हवेलीचे आमदार अॅॅड. अशोक पवार यांचेकडे केली आहे. कामाचा दर्जा सुधारण्यात यावा अशी मागणी रयत शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
शिंदेवाडी ते हिंगणगाव रस्त्याची गेली पन्नास वर्षांपासून दुरावस्था झाल्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे, जिल्हापरिषद सदस्या कल्पना जगताप, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष जगताप, सरपंच संदीप जगताप, रामदास शिंदे, सिद्धेश्वर शिंदे, उपसरपंच परशुराम शिंदे माजी उपसरपंच प्रभाकर जगताप सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे यांनी शिरूर-हवेलीचे आमदार अॅॅड. अशोक पवार यांचेकडे वारंवार पाठपुरावा केला. पाठपुराव्याची दखल घेऊन आमदार अॅॅड. अशोक पवार यांनी या रस्त्यासाठी तीन कोटीचा रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे अनेक वर्षांपासून दुरावस्था झालेल्या रस्त्याचे काम सुरु झाले. परंतु संबधित ठेकेदाराकडून अंदाजपत्रकानुसार काम होत नसल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत लेखी तक्रार रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामदास कोतवाल, उपाध्यक्ष सुशील शिंदे यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे व शिरूर-हवेलीचे आमदार अॅॅड. अशोक पवार यांचेकडे केली आहे. रस्त्याचे काम दर्जेदार करण्यासाठी संबधित ठेकेदारला सूचना कराव्या अशी मागणी शेतकरी संघटनेनी केली आहे. याबाबत ठेकेदार व संबधित अधिकारी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असतात संपर्क होऊ शकला नाही.
गेली पन्नास वर्षांपासून दुरावस्था झालेल्या या रस्त्याला आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून तीन कोटी रुपयांचा भरीव निधी मिळाल्यामुळे रस्त्याचे काम सुरु झाले. काम सुरु झाल्यामुळे नागरिकांमधून समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु संबधित ठेकेदाराकडून निकृष्ट दर्ज्याचे काम केले जात आहे.
– सुशील शिंदे (पुणे जिल्हा उपाध्यक्ष, रयत शेतकरी संघटना)