विद्यार्थ्यांनो कोणत्याही प्रकाराचे व्यसन करु नका – मुळीक
लोहगाव येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहगाव : विद्यार्थ्यांच्या जीवनातील दहावी, बारावीचा हा महत्वाचा टप्पा असून त्यानंतर करिअरची दिशा ठरते. पुढे आपण काय बनणार आहोत, याचे ध्येय निश्चित होते. विद्यार्थ्यांनो कोणत्याही प्रकाराचे व्यसन करु नका. त्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होते. आपली संस्कृती जपा. आपली भूमी ही संताची, वीरांची भूमी आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे न्या असे आवाहन माजी आमदार जगदीश मुळीक यांनी केले.
जगदीश मुळीक फाऊंडेशन आणि संतोष खांदवे युवा मंच यांच्या माध्यमातुन लोहगाव येथे इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ’ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुळीक बोलत होते.
कार्यक्रमास माजी स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, आयोजक संतोष (लाला) खांदवे पाटील, राजेंद्र खांदवे, प्रीतम खांदवे, मोहन शिंदे, रावसाहेब राखपसरे, अदित्य खांदवे, हनुमंत खांदवे, सुनिल मास्तर खांदवे, हनुमंत खांदवे, सुनिल खांदवे पाटील, सुधीर काळभोर, दिपक मोझे, सूरज निंबाळकर, संतोष खांदवे, बंटी जंगम, वैभव शिंदे, रुपेश पवार, सुधीर मगर, बाबुराव ठणके, सचिन खांदवे, गणेश खांदवे, दिलीप राखपसरे, सुमन खांदवे, शशांक खांदवे यांच्यासह पदाधिकारी, विद्यार्थी व पालक उपास्थित होते.
मुळीक म्हणाले, लोहगावच्या हद्दीत असणारे पुणे विमानतळास संत तुकाराम महाराजांचे नाव असेलच पाहिजेत. यासाठी शंभर टक्के प्रयत्न करू अशी ग्वाही याप्रसंगी मुळीक यांनी दिली.