भाजप युवा मोर्चाच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत

वाघोली : भाजप युवा मोर्चाच्या वतीने कोकणातील महाड, पोलादपूर, खेड, चिपळूण भागातील नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
नैसर्गिक आपत्तीमुळे अचानक असंख्य कुटुंबांवर संकट कोसळले आहे. संकटात असलेल्या कुटुंबांना भाजप युवा मोर्चाच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरूड येथील निवासस्थानी टेम्पोला हिरवा झेंडा दाखून सेवाकार्याला सुरुवात करण्यात आली. कोकणातील महाड, पोलादपूर, खेड, चिपळूण भागातील पूरग्रस्तांना किराणा सामान, कपडे, पाणी बॉटल, सॅनटरी पॅड, औषधे आदि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
पूरग्रस्त बांधवांची सेवा करण्याची संधी भैरवी वाघ पलांडे (सचिव भाजयुमो महाराष्ट्र) यांच्यामुळे मिळाली असल्याची भावना भाजप युवा मोर्चाचे हवेली तालुका महामंत्री योगीराज शिंदे यांनी व्यक्त केली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील, विक्रांतदादा पाटील, भैरवी पलांडे, गिरीष बापट, बाळाभाऊ भेगडे, गणेश तात्या भेगडे, प्रदीपदादा कंद, दादासाहेब सातव पाटील, रवींद्र कंद, सुशील मेंगडे, अनुप मोरे, किरण दगडे, संदीप आबा सातव, अनिल सातव यांच्या मार्गदर्शनाखाली हे सेवाकार्य पार पडले. यावेळी गणेश बापू कुटे, विजय जाचक, गणेश सातव उपस्थित होते.