युवासेनेच्या वतीने पूरग्रस्तांना शिधा कीटचे वाटप
पुणे : महाड या ठिकाणी बिरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील दुधानेवाडी व परिसरातील पूरग्रस्तांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, युवासेना सचिव वरून सरदेसाई, स्थानिक आमदार भरत गोगावले, कार्यकारिणी सदस्य रुपेश कदम यांच्या मार्गदर्शनाने युवासेनेच्या वतीने पिण्याचे पाणी, अन्नधान्य किट, बिस्किटे, औषधे वाटप करण्यात आले.
नैसर्गिक आपत्तीमुळे अचानक ओढवलेल्या संकटामुळे असंख्य कुटुंबांचे मोठे नुकसान झाले. संकटात असलेल्या कुटुंबांना छोटीशी मदत म्हणून युवासेनेच्या भागाची पाहणी करून पिण्याचे पाणी, अन्नधान्य कीट, छोट्या मुलांना बिस्कीट व औषधींचे वाटप करण्यात आले.
यावेळी कृषी अधिकारी प्रमोद देशमुख, महाराष्ट्र राज्य युवासेना सहसचिव विशाल सातव पाटील, रायगड युवासेना जिल्हाप्रमुख विकासजी गोगावले, शिवसेना उपशहर प्रमुख संदीप कदम, युवासेना अधिकारी सागर पवार, युवासेना तालुका समन्वयक प्रकाश लोले, युवासेना उप तालुकाप्रमुख श्रेयस वलटे पाटील, युवासेना वाघोली शहर प्रमुख ओंकार तुपे, सामाजिक कार्यकर्ते तुषार सातव पाटील, ओंकार पायगुडे, चेतन टाव्हरे, राहुल शेळके, प्रविण वाणी, सुधीर गायकवाड, सौरभ कांबळे ग्रामस्थ, शिवसैनिक आदी उपस्थित होते.
नैसर्गीक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या कुटुंबांना युवासेनेच्या वतीने अन्नधान्य कीटचे वाटप करून खारीचा वाटा उचलला आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी समाजातील दानशूर व्यक्तीने पुढे येऊन सढळ हाताने मदत करावी.
– विशाल सातव पाटील (युवासेना सहसचिव, म.रा.)