वाघोली येथे शनिवारी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक
वाघोली भाजप शहराध्यक्ष विजय जाचक यांची माहिती
वाघोली : शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघातील वाघोली शहरातील भाजपा बुथ अध्यक्ष, शक्तिकेंद्र प्रमुख व वाघोली शहरातील तालुका, जिल्हा व प्रदेश पदाधिकारी यांची तातडीची बैठक उद्या गुरुवार (दि. २६ आक्टोंबर) सकाळी ११ वाजता वाघोली येथील विजय जाचक संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आली असुन या बैठकीमध्ये पुढील रणनीती ठरविली जाणार आहे. बैठकीला पदाधिकाऱ्यांनी भाजप उपस्थित रहावे असे आवाहन जाचक यांनी केले आहे.