एक गुंठ्याची दस्तनोंदणी सुरु करा
अॅॅड. शरद बांदल यांची महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी

वाघोली : पुणे शहर व जिल्ह्यात एक-एक गुंठा असलेल्या मिळकतीचे दस्तऐवज नोंदणी बंद आहे. त्यामुळे सामान्य कुटुंबाला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. एक गुंठ्याची दस्तनोंदणी (खरेदी) सुरु करावी अशी मागणी अॅॅड. शरद तुकाराम बांदल यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पुणे शहर व जिल्ह्यातील एक गुंठ्याचे असलेल्या मिळकतीचे दस्तऐवज नोंदणी बंद आहे. एखाद्या सर्वसामान्य कुटुंबाला आर्थिक अडचण असल्यास एखादा गुंठा विकून अडचण भागवू शकतो. परंतु एका गुंठ्याची दस्त नोंदणी बंद असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. सुख, दु;ख, लग्न आदिसाठी पैसा कुठून आणायचा अशा प्रश्न सामान्य कुटुंबापुढे उभा राहिला असून लवकरच एक-एक गुंठ्याची दस्तऐवज नोंदणी सुरु करावी अशी मागणी अॅॅड. शरद बांदल यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
एक-एक गुंठ्याची दस्तऐवज नोंदणी बंद असल्यामुळे गरीब कुटुंबातील घटक आर्थिक अडचणीत आला आहे. आधीच कोरोना सारख्या महामारीमुळे असंख्य कुटुंब हातघाईस आले असताना त्यातच गुंठ्याची नोदणी बंद आहे. त्यामुळे अजूनच आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे.
– अॅॅड. शरद बांदल