अशोकबापू खांदवे यांच्या कार्याला सलाम – शहराध्यक्ष प्रशांत जगताप

वाघोली : केंद्र सरकारने सर्वांना मोफत लस दिली जाईल अशी घोषणा केली होती, मात्र प्रत्यक्षात लसीचा पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे लसीकरणापासून अनेक नागरिक वंचीत आहेत. सर्व सामान्य नागरिकांची ही गरज ओळखून बी. डी. खांदवे ग्रुपने स्वखर्चातून सर्वांपर्यंत लस पोहचवत असून त्यांच्या दानतवाला माझा सलाम आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी काढले.
लोहगाव येथे माजी पंचायत समिती सभापती अशोकबापू खांदवे व बी. डी. खांदवे ग्रुप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त १२ ते २३ जुलै दरम्यान अजितोसत्व सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहा दरम्यान मोफत लस दिली, रिक्षा चालकांना मोफत गॅस, विद्यार्थ्यांना मोफत अकॅडमी कॅलेंडर वाटप, वृक्षारोपण व शिक्षकांचा सत्काराचे आयोजन केले आहे. तसेच लोहगाव कचरा मुक्त करण्यासाठी सहा कंटेनर व सर्वत्र प्रकाशमय करण्यासाठी पाचशे एलईडी लाईटचा लोकार्पण सोहळा देखील होणार आहे. या कार्यक्रमात शहराध्यक्ष जगताप बोलत होते. कार्यक्रमास आमदार सुनील टिंगरे, जेष्ठ नेते पांडुरंग खेसे, नानासाहेब नलावडे, राजेंद्र खांदवे, नवनाथ मोझे, अर्जुन गरुड, उद्योजक बाळकृष्ण खांदवे, भाऊसाहेब खांदवे, सचिन खांदवे, सागर खांदवे, प्रशांत खांदवे, डॉ. शेंडगे, डॉ. साठे, हेमराज खांदवे, डॉ. चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार टिंगरे, पांडुरंग खेसे आदी मान्यवरांनी अजितोसत्व या सप्ताहाचे कौतुक केले. कोरोना काळात नागरिकांना मोफत गॅस सिलेंडर उपलब्ध करून देणाऱ्या लोहगाव येथील प्रशांत जगताप यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.